कोंबडा पाहिला की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते तर काहींचा अगोदरच ढेकर निघतो. काहींना कोंबड्याचा डौल आवडतो. मराठीत कोंबड्यावरील लोकगीत ही कमी नाहीत. ग्रामीण भागात ही गाणी लोकप्रिय आहेत. पण जळगावमध्ये तर गुलाबी कोंबड्याचाच वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. हे वाचून तुम्हाला पण आश्चर्य वाटत असले. कारण गाय, बैल, कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्याच्या घटना आपण पाहिल्या असतील अथवा ऐकल्या सुद्धा असतील. पण जळगाव जिल्ह्यात कुटुंबाने कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे. काय आहे हे नवल?
कापडणे कुटुंबांनी साजरा केला वाढदिवस
माणसांचा वाढदिवस साजरा होताना आपण नेहमी पाहतो. मात्र एखाद्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केल्याचं ऐकून तुम्हाला नवल वाटले असेलच. रोज अनेक कोंबड्यांचा बळी जातो. कोंबडा कापला नाहीतर अनेकांना जेवण जात नाही. पण जळगावमधील हे कुटुंब त्याला अपवाद आहे. शहरातील हरी विठ्ठल नगर भागातील विक्रम कापडणे परिवाराने मात्र आपल्या कोंबड्या चां पाचवा वाढ दिवस साजरा करून सगळ्याचे लक्ष वेधले आहे.
पाच वर्षांपासून कोंबड्याला लावला जीव
जळगाव शहरातील विक्रम कापडणे हे अनेक वर्ष पासून कोंबडी पालन करीत आहेत पाच वर्ष पूर्वी त्यांच्या कोंबडी ने काही पिले जन्माला घातली होती, मात्र त्यात एकच पिलू जिवंत राहिले होते, अशातच कोंबडी ही मांजराने पळून नेल्याने, एकट्या पिलाचा सांभाळ कापडणे परिवाराने गेल्या पाच वर्षांपासून केला आहे.
कोंबड्याचा वाढ दिवस साजरा
लहानपणापासून या कोंबड्याला घरातल्या लहान बाळ प्रमाणे सांभाळ केला असल्याने,या कोंबड्याला आणि कापडणे परिवाराला एकमेका विषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे. घरातील सदस्य प्रमाणे पाच वर्ष या कोंबड्याला कापडणे परिवार सांभाळत असल्याने, त्याचा 31 डिसेंबर रोजी येणारा वाढ दिवस ही ते गेल्या पाच वर्ष पासून आवर्जून करत आहेत. कोंबड्यांचा वाढ दिवस साजरा करताना त्याला हार घालून,औक्षण करून आणि केक भरवत वाढ दिवस साजरा केला.