जळगाव : कोरोनाने आपल्याला शिकवण दिली आहे. रस्त्यावर भाजीपाला विकला तरी आपण पोट भरु शकतो. त्यामुळं रस्त्यावर भाजीपाला विकायची लाज बाळगू नका, असं आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. वधू-वर परिचय मेळाव्यात ते आज बोलत होते.
जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. जिल्हयात १ हजार मुलांमागे ८९१ मुली आहेत. त्यामुळं वधू-वर परिचय मेळाव्यात, असं मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.
जळगाव कोरोनाने आपल्याला शिकवून दिलं की, रस्त्यावर भाजीपाला विकला तरी आपण आपला प्रपंच चालवू शकतो. असे म्हणताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यापारी बदलू शकतो. मात्र शेतकरी बदलू शकत नाही, असे वक्तव्य केलं. सोबतच जोडीदार निवडताना शेतकरी मुलाचाही मुलींनी विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं. लेवाभवनात रविवारी कोळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडला. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बोलत होते.
आपण आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला, फळे रस्त्यावर विकली तरी आपण पोट भरु शकतो. आपल्याला त्या कामाची शरम असायला नको, ही मानसिकता मुलामध्ये असली पाहिजे. नोकरीला नाही तर स्वतः चार जण आपल्याकडे नोकरीला ठेवू शकतो, असेही यावेळी पालकमंत्री मनोगतात म्हणाले. यावर प्रकाश टाकताना पालकमंत्री पाटील यांनी अशाप्रकारे मेळावे गरजेचे असली तर मात्र मेळाव्यांमधून किमान दहा तरी विवाह जुळावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.