मुंबई : राज्यात सध्या फोन टॅपिंगवरून (Phone Tapping) जोरदार आरोप सुरू झाले आहेत. याबाबत ज्या नेत्यांचे फोन टॅप केले त्यांचे जबाब आताा नोंदवण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला आता चांगलाच वेग आणला आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. आता याचवरून फडणवीसांचा कट्टर विरोधक एकनाथ खडसेही (Eknath Khadase) चांगलेच आक्रमक झाले आहेत. कारण एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, या नादात माझं फोन टॅपिंग करण्यात आलं, असे म्हणत खडसेंनी पुन्हा फडवीसांवर निशाणा साधला आहे.
तर तब्बल 67 दिवस एकनाथ खडसे यांचा फोन टॅप झाल्याची माहिती समोर आली. यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आली आहे. 67 दिवस माझा फोन टॅपिंग होणे ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. फोन टॅपिंग करणे हे एक नीच कृत्य मला राज्यभर बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे, असेही खडसे म्हणाले आहेत. तसेच याबाबत मी माझ्या वकीलाला भेटून याबाबत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खडसे म्हणाले आहेत. तसेच आधीच खडसे आणि फडणवीसांचा संघर्ष महाराष्ट्रला परिचित आहे, आता फोन टॅपिंग प्रकरणावरून हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी हे फोन टॅपिंग करणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकराच्या काळात फोन टॅप झाल्याने यावरून भाजवरही गंभीर आरोप होत आहे. तर गृह खातं हे मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांकडेच असल्याने फडणवीसांवरही थेट आरोप होत आहेत. भाजप नेते मात्र फोन टॅपिंग हे विनाकारण होत नसतात, त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येईल, सांगत आहे.
Nanded | ….तर आमदारकी सोडेन! आमदार Prashant Bamb यांचं बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना ओपन चॅलेंज!
Kirit Somaiya : ‘कर नाही तर डर कशाला’? सोमय्या दोन दिवसांपासून कुठे गायब?-काँग्रेसचा सवाल