जळगाव : पैशासाठी पोलिसानेच कापूस व्यापाऱ्याती हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने पोलिसाने व्यापाऱ्याची हत्या घडवून आणली. सदर पोलीस जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. स्वप्नील रत्नाकर शिंपी असे मयत कापूस व्यापाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी या व्यापाऱ्याची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच आरोपींची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कापूस व्यापारी स्वप्निल शिंपी एरंडोल तालुक्यातील फरकांडे गावातील रहिवासी आहेत. फरकांडे येथे त्यांचे धनदाई ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. स्वप्नील शिंपी आणि दिलीप चौधरी हे दोन व्यापारी शुक्रवारी दुपारी जळगाव येथे गेले होते. तेथे त्यांनी दोन व्यापाऱ्यांकडून अंदाजे 15 लाख रुपये रक्कम घेतली आणि पुन्हा घराकडे परतत होते. परतीच्या प्रवासात प्रतापनगर येथून रात्री 8 च्या सुमारास मेडिकलमधून वडिलांच्या गोळ्याही घेतल्या. त्यानंतर घरी जात असतानाच पाळधी येथील साई मंदिराजवळ महामार्गावर रात्री 8.30 च्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्यांची गाडी अडवली.
पुलावर एका दुचाकीला आपल्या गाडीची धडक लागल्याचा बहाणा सांगत त्यांनी शिंपी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद घालत आरोपी त्यांच्या गाडीत घुसले. मागच्या सीटवर बसलेल्या आरोपीने चाकू काढून शिंपी यांच्यावर हल्ला केला. हल्ला करताच शिंपी आणि त्यांचे जोडीदार चौधरी यांनी पैशांची बॅग घेऊन गाडीतून बाहेर पडले आणि जीव वाचवण्यासाठी धावू लागले. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करीत आणखी वार केले. यावेळी दिलीप चौधरी यांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच दोन तरुण धावून आले. या तरुणांना पाहताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिंपी यांचा मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात पाठवला. सीसीटीव्ही फुटेज व पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. (In Jalgaon, a cotton trader was killed by the police for money)
इतर बातम्या
पिंपरीत लॉजवर देह व्यापार, दोन महिलांची सुटका, छाप्यात सापडली कंडोमची पाकिटं
CCTV | आधी कारची काच फोडली, मग चोरटा अख्खा आत घुसला, उल्हासनगरात पाच लाखांची धाडसी चोरी