सुवर्णनगरी जळगाव येथील सराफा बाजारात सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली. सोन्याच्या दराने सपाटून मार खाल्ला. तर चांदीत पण आपटी बार दिसला. काल सराफा बाजार गडगडला होता. तर आज सोने आणि चांदीत मोठी घसरण दिसली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. दर घसरल्याने आज खरेदीदारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींचा दोन्ही मौल्यवान धातूवर परिणाम दिसून आला. किती कमी झाल्या किंमती, जाणून घ्या…
काय आहेत आता भाव
सोन्याचे दर १ हजार २३९ रुपयांनी, तर चांदीचे दर ३ हजार ६९३ रुपयांनी झाले कमी झाले. चांदीचे दर आले ८२ हजार रुपयांवर तर सोन्याचे दर ६९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले. शेअर बाजारासह सराफा मार्केटवर जागतिक घडामोडींचा परिणाम दिसून आला.अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता, इराण व इस्रायल युद्ध भडकण्याची भीती आणि बांगलादेशातील घडामोडींचा परिणाम बाजारावर दिसून आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,117, 23 कॅरेट 68,840, 22 कॅरेट सोने 63,311 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,838 रुपये, 14 कॅरेट सोने 40,433 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 78,950 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.