जळगावातील शासकीय आशादीप वसतिगृहाच्या अधीक्षिका यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. शासकीय कामाच्या तणावात असलेल्या पतीमुळे त्यासुद्धा मानसिक तणावात असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कारवाईच्या मागणीवरून मयत अधीक्षिका यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्र नातेवाईकांनी घेतला होता. घटनेनंतर जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यानी जिल्हा रुग्णालयात मयत अधिकारी महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत समजूत घातली.
यावेळी मयत अधीक्षिका यांच्या कुटुंबीयांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे..तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर महिलेची नातेवाईक हे मृतदेह ताब्यात घेत गावाकडे रवाना झाले. मुख्यमंत्री यांच्या नावाने हे निवेदन महिलेच्या कुटुंबीयांनी तहसीलदार यांना दिले. मयत अधिकारी महिलेचे पती हे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात कार्यक्रम अधिकारी आहेत..
काय आहे आरोप
कार्यक्रम अधिकारी असलेल्या पतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकांमध्ये अपमान करणे, आज शब्द भाषेत बोलणे अशा पद्धतीने टॉर्चर करत असल्याचं निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषदेत कार्यक्रम अधिकारी असलेल्या पतीला होत असलेल्या त्रासामुळेच मयत अधीक्षिका या सुद्धा तणावात होत्या. याच तणावातून त्यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तर आपली मुलगी ही प्रशासकीय व्यवस्थेचा बळी ठरल्याच वडिलांनी म्हटले आहे.
पतीच्या ताणतणामुळे पत्नी असलेल्या अधिकारी महिलेचा ही मानसिक स्वास्थ्य बिघडलं होतं आणि त्याच तणावातून त्यांचा प्रयत्न झाला याचा आरोप नातेवाईकांनी निवेदनातून केला. या गोष्टीला कारणीभूत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा निवेदनाद्वारे मयत अधिकारी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावाने देण्यात आल्या असून तहसीलदार यांना हे निवेदन दिल्यानंतर मयत अधिकारी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत नगर जिल्ह्यातील गावाकडे रवाना झाले आहेत. या प्रकारामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.