बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो, शिवसेना आमदाराचा Eknath Khadse यांच्यावर संताप

| Updated on: Mar 27, 2022 | 8:56 AM

गरीब कुटुंबातील सर्वसामान्य माणूस हा आमदार झाला हे खडसेंच्या जिव्हारी लागलं. नेहमी माझ्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरते, असं जळगावातील मुक्ताईनगरचे (Muktainagar) शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले

बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो, शिवसेना आमदाराचा Eknath Khadse यांच्यावर संताप
उद्धव ठाकरे, एकनाथ खडसे, शरद पवार
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

मुक्ताईनगर : सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा घणाघात जळगावातील मुक्ताईनगरचे (Muktainagar) शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. मुक्ताई मंदिरातील 5 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर पाटील बरसले. एकनाथ खडसेंकडून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. तर मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवावे असे आव्हान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

“बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो”

एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे, आता बस झाले त्रास सहन करणे, असंही सेना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

“सर्वसामान्य माणूस आमदार, हे खडसेंच्या जिव्हारी”

एकनाथ खडसे यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्यावरून त्यांचे वैफल्य दर्शवते. गरीब कुटुंबातील सर्वसामान्य माणूस हा आमदार झाला हे खडसेंच्या जिव्हारी लागलं. नेहमी माझ्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरते. मीही महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्याने माझ्यावर टीका करत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार चालू आहे. 35 वर्षांपासून मतदारसंघात विकास खुंटला, मी विकास कामे करायला लागलो आणि त्यांना जिव्हारी लागले, अशी तोफही चंद्रकांत पाटील यांनी डागली आहे.

एकनाथ खडसेंचा पलटवार

दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निधीचा पाठपुरावा केल्याचे एक पत्र दाखवावे, आमदार खोटारडे आहेत, करंटे आहेत, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवावे असे आव्हान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.

शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील हे खोटारडे आहेत. आम्हीच या कामांचा पाठपुरावा केला होता, असा हल्लाबोल करत एकनाथ खडसे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील तेव्हा गिरीश महाजनांना मुख्यमंत्रीपद मिळेल- एकनाथ खडसे

मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानं छळवणूक केली, फोन टॅपिंग केलं ईडी मागं लावली: एकनाथ खडसे

Eknath Khadse चं नाव न घेता Ajit Pawar यांचे Devendra Fadanvis यांना चिमटे!