महिन्याभराने आलेल्या पावसामुळे मंत्री अनिल पाटील भारावले, भर पावसात रस्त्यात उतरले आणि…

| Updated on: Sep 07, 2023 | 9:30 PM

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज चांगला पाऊस पडला आहे. अमळनेरमध्येही पावसाने चांगली बॅटिंग केलीय. विशेष म्हणजे महिन्याभरात पावसाने हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील भारावले. ते भर पावसात रस्त्यावर उतरले. त्यांनी देवाचे आभार मानले.

महिन्याभराने आलेल्या पावसामुळे मंत्री अनिल पाटील भारावले, भर पावसात रस्त्यात उतरले आणि...
Follow us on

जळगाव | 7 सप्टेंबर 2023 : राज्यात पावसाचं पुनरागमन झालंय. पावसाने पुन्हा आगमन केल्याने अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी सुटकेता श्वास घेतला आहे. अनेक भागांमध्ये आता पिकांना पाणी मिळणार आहे. या पावसाची गेल्या महिन्याभरापासून शेतकरी वाट पाहत होते. अखेर हा पाऊस शेतकऱ्यांना पावला आहे. विशेष म्हणजे पाऊस पडल्याचा आनंद राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीदेखील व्यक्त केलाय. त्यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून भुमातेला नारळ फोडून देवाचे आभार मानले आहेत. संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय.

जळगाव जिल्ह्यात तब्बल महिन्याभरापासून पाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य निर्माण झाली होती परिस्थिती होती. सर्व धर्मियांकडून पावसासाठी देवाला साकडं घालण्यात आलं होतं. आता जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील यांनी जळगावातील अमळनेर येथे भूमातेला नारळ फोडून देवाचे आभार मानले आहेत.

देवाने प्रार्थना कबूल केल्याने पाटलांनी देवाचे मानले आभार

गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस पडावा म्हणून राज्यभरात सर्वांकडून नमाज, प्रार्थना अशा वेगवेगळ्या पद्धतीने साकडे घालण्यात आले होते. पावसाने पुनरागमन केल्याने राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून भूमातेला नारळ फोडून देवाचे आभार मानले आहेत.

अनिल भाईदास पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी श्रावण सोमवार निमित्ताने महादेवाच्या निघालेल्या कावड यात्रेत सहभागी होत पावसासाठी साकडे घातले होते. देवाने प्रार्थना कबूल केल्याने ज्या भुमातेत मंत्री पदाची संधी मिळाली, त्याच अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांनी भूमातेचे पूजन करून नारळ फोडून देवाचे आभार मानले आहेत.

अनिल पाटील काय म्हणाले?

भर पावसात छत्री न घेता, मंत्री पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मंत्री अनिल पाटील यांनी पावसात पूर्णपणे भिजत भूमातेचे वंदन करत आभार मानले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात का होईना, या पावसामुळे दिलासा मिळणार आहे. पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यावरही काही प्रमाणात हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी सांगितलं.