“गुलाबरावांनी जलजीवन मिशन योजनेत घोटाळा केला”; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेवर घोटाळ्यावरून घणाघात

| Updated on: Jun 11, 2023 | 5:21 PM

विधानसभेत ही प्रश्न उपस्थित केला गेला आहे. त्यामुळे आधी या पाच मंत्र्यांचे राजीनामे घ्या मगच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वीकारलेलं धोरण योग्य असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

गुलाबरावांनी जलजीवन मिशन योजनेत घोटाळा केला; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेवर घोटाळ्यावरून घणाघात
Follow us on

जळगाव : राज्यातील राजकारण आता वेगवेगळ्या घटना घडामोडीमुळे प्रचंड ढवळून निघाले आहे. एकीकडे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून विरोधकांकडून टीका केली जात आहे. तर त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पाच मंत्र्यांचे राजीनामा घेतल्याशिवाय या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तळात खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे पाच मंत्र्यांच्या कामावर भजाप हायकमांड नाराज असल्याने कामगिरी खराब असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार करु नका असही एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. या पाच मंत्र्यांमध्ये जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेतल्याने खडसे आणि पाटील हा वाद विकोपाला गेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील राजकारण खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच आता आमदार एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आता चर्चेला उधान आले आहे.

यावेळी एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी जलजीवन मिशन योजना घोटाळ्यात गुलाबराव पाटील यांचे नाव घेतले गेल्याने आता त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाना भिडले आहेत. त्यामुळे आता या दोन बड्या नेत्यांकडून एकमेकावर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

एकनाथ खडसे यांनी आरोप केल्यामुळे आता गुलाबराव पाटील यांनी पलटवार करत खडसे यांना आपल्या जावयाच्या आठवण करुन दिली आहे. गुलाबराव म्हणतात खडसे आधी आपल्या जावायचं बघा. कारण एकनाथ खडसेंचे जावई दोन ते तीन वर्षांपासून कारागृहात असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा खाते आहे. त्यातच महाराष्ट्रात जलजीवन मिशन ही योजना अयशस्वी झाली आहे.

त्याबाबत विधानसभेत ही प्रश्न उपस्थित केला गेला आहे. त्यामुळे आधी या पाच मंत्र्यांचे राजीनामे घ्या मगच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वीकारलेलं धोरण योग्य असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

भाजपने त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटलांना लक्ष्य केलं आहे. खडसेंच्या आरोपांवर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी खडसेंना जोरदार चिमटा काढला आहे. आधी आपल्या जावायचं बघा असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी त्यांच्याविषयी बोलणं टाळलं आहे.