जळगाव – माझी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे, की कामावर रुजू व्हावे. आता कोरोनाच्या संकटानंतर शाळा सुरु झाल्या आहेत , गरीबांसाठी एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधना आहे. असे सगळं असतानाही एसटी कर्मचारी हट्टाला पेटलेत हे बरोबर नाही. शेवटी एसटी कर्मचारीही आपलेच आहेत व प्रवासीही आपलेच आहेत यामध्ये समजूतदार भूमिका घेणे आवश्यक आहे. माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अनेकदा मुभा ही अनिल परब यांनी दिली. मात्र या सगळ्याची सहनशीलता संपण्याची वेळा आली आहे. सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. त्यामुळे सगळ्या एसटी कामगारांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे, असेही ते म्हणाले आहे.
हल्ला करणे चुकीचं
अनेक ठिकाणी एसटी सुरु झाल्यानंतर दगडफेक केली जाते. हे जनतेचं नुकसान आहे. काहीजण नोकरीला येत आहे. उद्या वेगळी भूमिका घेतली. मेस्माचसारखा निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेतला तर. आतापर्यंत तुटेपर्यंत ताणाऱ्या संपामध्ये काय झालं हे पाहिलं आहे.
समंजस भूमिका घ्या
कुणी ऐकायला तयार नसेल नवीन भरती सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार की नाही. मंत्रिमंडळात चर्चा झाली. टोकाची वेळ येऊ देऊ नये.
आग्रहाची विनंती आहे. आता मानधन बऱ्यापैकी वाढवलं आहे. आजूबाजूच्या राज्यांएवढं दिलं आह. एक गोष्ट खरी आहे की पगार कमी होता. आता पगार वाढवला. पगार वेळच्या वेळी देण्याचा निर्णय झाला. परब यांनी शब्द दिला आहे. आम्ही त्याला बांधिल आहोत. आता समंजस भूमिका घ्या. आपण एकाच परिवारातील आहोत. त्यामुळे टोकापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका असे पवार यांनी म्हटले आहे.
Positve News | रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, थंडीच्या कडाक्यात बहरतोय हरभरा
फटाफट पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, तुम्हाला यश नक्की मिळेल!