जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 14 आणि रावेरमध्ये 24 उमेदवार रिंगणात होते. जळगाव रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निरीक्षकांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले. यात स्मिता वाघ यांचा सर्वाधिक खर्च झाला असून त्यापाठोपाठ रावेरमधील महायुतीचे उमेदवार श्रीराम पाटील आणि भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा खर्च झाल्याचे स्पष्ट झालं आहे. जळगाव लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार स्मिता उमेदवार यांचा 77 लाख 42 हजार 964 एवढा खर्च झाला आहे.
रावेर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा 64 लाख 20 हजार 130 रुपये एवढा खर्च झाला आहे. रावेर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांचा 61 लाख 10 हजार 648 रुपये एवढा खर्च झाला आहे. जळगाव लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांचा 55 लाख 98 हजार 741 रुपये एवढा खर्च झाला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात एका उमेदवाराने केवळ 200 रुपये तर रावेरमधील एकाने 1100 रुपये खर्च करीत लोकसभा निवडणुक लढविल्याचे दिसून आले. जळगाव लोकसभेचे निवडणुकीचे निरीक्षक कुमार चंदन आणि रावेर लोकसभेचे निवडणुकीचे निरीक्षक संदिपाल खान यांनी तीन टप्प्यात हिशेबाची पडताळणी केली. खर्चासह अन्य देयके सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 4 जुलैला ही मुदत संपल्यानंतर निरीक्षकांनी खर्चाचे विवरणावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निरीक्षकांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार स्मिता वाघ यांचा सर्वाधिक खर्च झाला असून त्यापाठोपाठ रावेरमधील श्रीराम पाटील आणि रक्षा खडसे यांचा खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगावमधील एका उमेदवाराने 25 हजारांची अनामत रक्कम वगळता केवळ 200 तर रावेरमधील एकाने 1100 रुपये खर्च करीत लोकसभा निवडणुक लढविल्याचे दिसून आले आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात 14 आणि रावेरमध्ये 24 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचा खर्चाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आयोगाने कुमार चंदन यांची जळगाव मतदारसंघासाठी तर रावेरसाठी संदीपान खान यांची नियुक्ती केली होती. या दोन्ही निरीक्षकांकरवी तीन टप्प्यात हिशेबाची पडताळणी करण्यात आली.१० मे ला तिसरा टप्पा पूर्ण झाला असताना निकालानंतरचा झालेल्या खर्चासह अन्य देयके सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ४ जुलैला ही मुदत संपल्यानंतर निरीक्षकांनी खर्चाचे विवरणावर शिक्कामोर्तब केले आणि गुरुवारी दुपारी ते रवाना झाले.