जळगाव : उद्धव ठाकरे यांनी सभेपूर्वी आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, कधी-कधी काही गोष्टी होत नाही. पुढचा टप्पा आपलाच आहे. ही आपली सुजलाम सुफलाम भूमी आहे. शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी जगुया. वैशालीताई यांनी फिल्म दाखवली. त्यांना साथ देणे गरजेचे आहे.
आर. ओ. तात्या पाटील यांची उणीव कायम भासत राहते. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी हे आर. ओ. तात्या पाटील यांचे कुटु्ंब होतं. पिकेल ते विकेल यासाठी जगभर संशोधन व्हावं, त्याला हमखास भाव मिळाला पाहिजे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
जगणार कुणासाठी स्वतःसाठी की इतरांसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत निर्मल पीकचं काय होणार. हा त्यांचा ध्यास होता. संपूर्ण शेतकरी हे त्यांचे कुटुंब होते, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. त्यांच्या कुटुंबाचे काय होणार हे त्यांचे लक्ष होते. माझ्या कुटुंबापेक्षा शेतकरी हित हा आर. ओ तात्या पाटील यांचा ध्यास होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
बुरशी ही उपयोग आहे शिवाय घातकही आहे. कोरोनातील बुरशी घातक होती. आता मला शेतकऱ्यांसाठी मला खूप काही करायचे आहे. त्यामुळे तुमची लॅब बघायला मी पुन्हा येणार आहे, असे उद्धव ठाकरे उद्योजकांशी बोलताना म्हणाले.
विकेल ते पिकेल. ही संकल्पना मी मांडली होती. पुढच्या वर्षी आपल्याला काय विकता येईल. ज्या वस्तूला भाव मिळेल अशा वस्तू पिकवल्या पाहिजे. खत कोणतं वापरायचं. विभाग कोणता आहे, याचा विचार केला पाहिजे, असंही ठाकरे यांनी सांगितलं.
शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली. पुढचा काळ आपला आहे. त्यावेळी शेतकरी सुजलाम सुफलाम कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.