जालना, ३ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली आहे. मनोज जरांगे म्हणाले, राज्य सरकारकडून केणेकर या आमदाराला चर्चेसाठी पाठवलं होतं. केणेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. बोलायची इच्छा नव्हती. कारण फडणवीस यांनी आमच्या विरोधात फार मोठी स्टेटमेंट केली होती. पण, देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला चुकीची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांना निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. पण, मनोज जरांगे म्हणाले, फक्त सक्तीच्या रजेवर पाठवून काही होणार नाही. दोषी पोलिसांना बडतर्फे करावे लागेल. मराठा आरक्षणाचा विषय तातडीने काढावा लागेल. गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आमदार केणेकर यांनी लवकरचं कळवतो, असं सांगितलं. ते कुणाशी बोलून निरोप कळवतात ते माहीत नाही.
गिरीश महाराज यांचाही फोन आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं मी भेटायला येतो. त्यांनी लवकरच येणार असल्याचं सांगितलं. लगेच तोडगा काढू असं महाजन म्हणाले. गिरीश महाजन चर्चा करून कसा मार्ग काढतात, हे लवकरच कळेल.
उद्या सकाळी आठ वाजता राज ठाकरे येणार आहेत. त्यांचासुद्धा फोन आला होता. राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं मनोज जरांगे यांना सांगितलं. या सर्व घडामोडी पाहता चर्चेतून मार्ग निघणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी आंदोलकांना लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक जखमी झालेत. हिंसक ४० जणांना अटक केली असल्याचं पोलीस महासंचालकांनी सांगितलं. या प्रकरणावरून राजकारण पेटलं आहे. विरोधक राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. पण, आता खऱ्या अर्थाने चर्चांना सुरुवात झाली आहे. या चर्चेतून काय मार्ग निघतो, हे पाहावं लागेल.