Ekanth Khadse | देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, त्यावर एकनाथ खडसे म्हणतात….

| Updated on: Sep 05, 2023 | 1:26 PM

Ekanth Khadse | देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अजून एकनाथ खडसे काय म्हणाले?. मागच्या आठवड्यात जालना येथे मराठी समाजावर पोलिसांनी लाठीमार केला. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटत आहेत. एकनाथ खडसे यांनी या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Ekanth Khadse | देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, त्यावर एकनाथ खडसे म्हणतात....
khadse and fadnavis
Follow us on

जळगाव : “मराठा समाजाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, ही आमची भूमिका आहे. त्यासाठी केंद्राने अध्यादेश काढावा आणि मराठा समाजाला अधिकच आरक्षण द्याव” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले. “आज 50 टक्के आरक्षण आहे. ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. त्यापेक्षा 50 टक्क्याच्यावर अधिकच आरक्षण द्यायच असेल तर तो केंद्राला अधिकार आहे. अनायसे, संसदेच अधिवेशन सुरु होत आहे. केंद्राने अध्यादेश काढून मराठा समाजाला अधिकच आरक्षण द्यावं. केंद्राने कायदा करावा, हा प्रश्न सोडवावा, चिघळवू नये” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली ही चांगली गोष्ट आहे. तीन दिवस आधी माफी मागितली असती, तर तीव्रता कमी झाली असती” असं खडसे म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलय की, नार्को टेस्ट केली, तर दूध का दूध, पानी का पानी होईल, त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, “कोणात्याही मोठ्या घटना ज्यावेळी घडतात, त्यावेळी लेखी आदेश असतोच असं नाही . तोंडी आदेशावर सुद्धा काम कराव लागतं” “लाठीचार्ज करायचा आदेश वरिष्ठांकडून आला, हा वरिष्ठ कोण असू शकतो? एखादी घटना घडली की, अंतिम जबाबदारी गृहखात्यावर मंत्र्यावर असते. रेल्वेचा अपघात झाला की, रेल्वे मंत्री राजीनामा देतो. लाठीचार्ज करण्यासाठी मी जबाबदार नाही, असं म्हणणं चुकीच ठरेल” असं खडसे म्हणाले.

….तर महाराष्ट्र पेटलाच नसता

“जालना येथे पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला. महाराष्ट्रातील मराठा समाज पेटला, रस्त्यावर उतरला. महाराष्ट्र पेटून उठतोय ही भिती गृहमंत्र्यांना वाटली. म्हणून लाठीचार्ज केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली. घटना घडली, त्यावेळीच माफी मागितली असती, तर महाराष्ट्र पेटलाच नसता. देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्याची सवय करुन घ्यावी लागेल. धनगर आरक्षण देऊ सांगितलं, ते अजून दिलेलं नाही” असं एकनाथ खडसे म्हणाले.