मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 9 दिवसांपासून सुरु केलेले उपोषण अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात, 4 वाजता ते उपोषण सोडणार आहेत. यावेळी त्यांनी राज्यात गाजलेल्या माधव पॅटर्नवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माधव पॅटर्न हा जातीवाद नव्हता का? असा थेट सवाल त्यांनी विचारला. मग यावेळी मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली तर त्यांना जातीवादी कसं ठरवता, असा रोकडा सवाल त्यांनी विचारला.
माधव पॅटर्न जातीवाद नव्हता का?
आपल्या जातीला चांगलं शिकविणारा कुणी नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तू आंदोलन संपू दे तुझा जातीयवाद संपवतो. मी जातीयवादी मग माधव पॅटर्न आणला तो जातीयवादी नव्हता का? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना विचारला. जातीयवाद वाढू नये जेवढी जबाबदारी मराठ्यांची तेवढी त्यांची पण आहे. फडणवीसांना वाटत असेल खड्डे भरुन निघेल, भरून निघणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडामधील मराठे एकच आहेत. आपल्या आंदोलनामुळे नोंदी सापडल्या. मुलींना मोफत शिक्षण मिळाले. पडून राहण्यात उपयोग नाही. आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय. आज संध्याकाळी 5 वाजता आंदोलन सोडणार.ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करणार. उपोषण स्थगित करतो आहे. आज आलेले आहे त्यांच्यासाठी 4 ते 5 वाजेपर्यंत थांबतोय. उद्यापासून आंतरवाली सराटीकडे येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार उपोषण सोडण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सगळ्या मागण्या मान्य करा
फडणवीसांनी मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमच्या सोबत दगा फटका करू नका. आाचारसंहिता लागेपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर खचून न जाण्याचे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. तुम्ही माझ्या पाठीशी आहेत मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आपल्या मुलांचा अपमान करू नका. जातीचा अपमान करू नका. कोणी पक्ष किंवा कोणी नेते आपले नाहीत, असे प्रतिक्रिया त्यांनी दिली.