Manoj jarange patil | आज मनोज जरांगे पाटील यांना दिल्या जाणाऱ्या पत्रात काय असणार?

| Updated on: Nov 02, 2023 | 10:24 AM

Manoj jarange patil | मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा आता आणखी तीव्र होत चालला आहे. आज अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांनी काल रात्रीपासून पाणी पीण बंद केलय. मनोज जरांगे पाटील यांना आज एक पत्र देण्यात येईल. त्यात काय असेल? या बद्दल जाणून घ्या.

Manoj jarange patil |  आज मनोज जरांगे पाटील यांना दिल्या जाणाऱ्या पत्रात काय असणार?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना (दत्ता कनवटे) : मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी जालन्यात अंतरवली-सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे. काल रात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पीण बंद केलय. मनोज जरांगे पाटील यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला अजून कितीवेळ लागणार? सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे प्रश्न विचारले होते. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारशी चर्चा करण्याची देखील तयारी दाखवली होती. सरकारच्यातीने आज शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटणार असल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज एक पत्र सुद्धा दिलं जाईल. या पत्रात काय असेल? त्या बद्दल जाणून घ्या.

‘आम्हाला अर्धवट आरक्षण नको’ अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. ‘आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही’ असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय. “आणखी कशासाठी वेळ पाहिजे. हे त्यांनी इथे येऊन महाराष्ट्राला सांगाव. त्यानंतर आम्ही विचार करु” असं मनोज जरांगे पाटील बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. आरक्षण मिळवूनच राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. काल राज्य सरकारवर त्यांनी टीका सुद्धा केली. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर पहिले सहा दिवस ते पाणी प्याले नव्हते. त्यामुळे ते स्टेजवरच कोसळले होते. आता सुद्धा त्यांनी पाणी बंद केलय.

मनोज जरांगे यांना आज दिल्या जाणाऱ्या पत्रात काय असणार?

1) काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा ठराव मनोज जरांगे यांना दिला जाणार

2) मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ वाढवून मागितला जाणार.

3) अंतरवली सराटीत जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा कृती कार्यक्रम.

4) मनोज जरांगे यांच्या सभेदरम्यान 441 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई.

5)ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करणे.

6) मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती.

7) मराठा समाजाला तातडीने मागास ठरविण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे

या सर्व मुद्द्यांसाह आणखी 4 मुद्दे पत्रात असतील.