जरांगेंनी पाटलांनी उपोषणाला स्थगिती देत, भाजपला हरवण्याचा घेतला पण

| Updated on: Jul 24, 2024 | 9:50 PM

भाजपचा एकही आमदार जिंकू देवू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

जरांगेंनी पाटलांनी उपोषणाला स्थगिती देत, भाजपला हरवण्याचा घेतला पण
Follow us on

भाजपचा एकही आमदार निवडून येवू द्यायचा नाही, आणि सत्तेतून खेचणार अशी शपथ घेवून 5 व्या दिवशी, जरांगेंनी उपोषण स्थगित केलं. भाजपला कधीच सत्तेत येवू देवू नका, असं मराठा समाजाला आवाहन करत फडणवीसांची आग मीच विझवणार असा हल्लाबोलही जरांगे पाटील यांनी केला. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशानंतर आता जरांगेंचं मिशन फिक्स झालं. सत्ताधाऱ्यांची खुर्ची ओढणे आणि आमदार पाडणे. मात्र पाडण्याची भाषा केल्यानं आता भाजपचेही नेते संतापले आहेत.

2013 मध्ये, नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणात जरांगे पाटलांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी झालंय. मात्र या मागे, गृहमंत्री फडणवीसांचाच हात असून जेलमध्ये टाकून गोळ्या घालण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. तर कोर्टाची प्रक्रिया म्हणत, फडणवीसांनी आरोप फेटाळले आहेत.

फडणवीसांनी म्हटले की, ‘मनोज जरांगे यांची केस २०१३ ची केस आहे. यापूर्वी आधीच त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट निघतं. पण तारखेवर हजर राहिलं तर ते रद्द होते. पुन्हा ते तारखेवर गेले नाही तर त्यांचा वॉरंट रद्द होईल. आमचा त्यात काहीही संबंध नाही. मी त्यांना दोष देणार नाही. उपोषणाच्या शेवटी ते माझ्य़ा आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली होती. उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता असं त्यांनी सांगितलं होतं.’

आता ज्या प्रकरणात जरांगेंचं अटक वॉरंट निघालं ते प्रकरण काय तेही पाहुयात.

2013 मध्ये जालन्यात धनंजय घोरपडेंच्या ‘शंभूराजे’ नाटकाच्या 6 प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं. मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांनी हे आयोजन केलं. प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये देण्याचं आयोजकांनी कबूल केल्याचा घोरपडेंचा दावा आहे.
मात्र प्रयोगाचे पूर्ण पैसे दिले नसल्याची धनंजय घोरपडेंची तक्रार आहे. पैसे न मिळाल्यानं घोरपडेंनी कोर्टात धाव घेतली. मात्र तारखेवर गैरहजर राहिल्यानं जरांगे पाटलांविरोधात पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झालं.

जरांगेंनी, आपला मोर्चा दरेकरांकडेही वळवला. फडणवीसांसह दरेकरांनाही वठवणीवर आणतो, असा इशाराच त्यांनी दिला. आतापर्यंत उपोषणाच्या माध्यमातून जरांगे सरकारवर दबाव आणत होते. मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी जरांगेंनी केली. म्हणजेच मराठा आरक्षण, आणि सगेसोयऱ्यांची पुढची लढाई राजकीय आखाड्यात होईल.