जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, रणजितसिंह नाईक-निंबाळकर मोदींच्या भेटीला, मोदींकडे काय मागितलं?

| Updated on: Feb 03, 2022 | 3:15 PM

माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार सदाभाऊ खोत, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देशाचे पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांची भेट घेतली. ही भेट सध्या चर्चेत आहे.

जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, रणजितसिंह नाईक-निंबाळकर मोदींच्या भेटीला, मोदींकडे काय मागितलं?
राज्यातले नेते मोदींच्या भेटीला
Follow us on

मुंबई : कालच देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे, त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. अशातच राज्यातल्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे.  माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार सदाभाऊ खोत, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देशाचे पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणे (Farmers), बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करणे, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करणे, शेतमाल अधिक वेगाने बाजारपेठेत पोचवण्यासाठी रेल्वेचे जाळे आखणे, शेतीमध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी कृषी महाविद्यालय स्थापण करणे, स्टार्टअप योजनेअंतर्गत नाबार्डच्या (Nabard) माध्यमातून कर्जपुरवठा करणे, असे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशातील शेतकरी कष्टकरी वर्गाला आशादायी असणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे सदाभाऊ खोत यांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

त्याचप्रमाणे साखर कारखान्यांवर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने आकारलेला प्राप्तिकर रद्द करण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला, त्याबद्दल देखील देशाचे पंतप्रधान मोदी यांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे यांनी आभार मानले. केंद्रतील सरकार हे निश्चितपणाने शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशिल राहिल तसेच शेती हा एक उद्योग म्हणून भरभराटीला कसा येईल या दृष्टीने हे सरकार काम करेल, असे मोदींनी अश्वस्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तीन कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले होते. परंतु, मूठभर लोकांनी याला विरोध केल्यामुळे ती विधेयक मागे घ्यावी लागली. परंतु माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सदाभाऊ खोत व गोपिचंद पडळकर यांनी कृषी कायद्याच्या समर्थनार्थ या कृषी कायद्याचे राज्यभर स्वागत करुन या कायद्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. राज्यात या कृषी कायद्या समर्थनार्थ यात्रेचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील ठिकठिकाणी स्वागत केले होते. जरी हे तीन कृषी कायदे मागे घेतले असले तरी देशातील शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी सर्व स्तरावरती मदत केली जाईल, असा विश्वास मोदींनी या भेटीवेळी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे.

BMC Budget 2022: सर्वांना पाणी, घराशेजारीच आरोग्य केंद्र, कचरा करणाऱ्यांकडून ‘वापरकर्ता शुल्क’ आकारणार; निवडणुकीच्या तोंडावर पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

Crop Insurance : पीकविम्यासाठी राज्याची स्वतंत्र योजना, कृषिमंत्र्यांनीही दिले संकेत, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

Parambir Singh: आरोपी बचावासाठी इतरांची नावं घेत असतो, राऊतांनी परमबीर सिंगांचे आरोप फेटाळले