व्हॉट्सअ‍ॅप चॅटसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण, ‘टाईप मी करत नाही तर…’

| Updated on: Dec 30, 2024 | 9:36 AM

जितेंद्र आव्हाड कसे काय सांगू शकतात तो स्क्रीनशॉट त्यांचा आहे की नाही. तो स्क्रीनशॉट खरा आहे. तो स्क्रीन शॉट जितेंद्र आव्हाडांचा आहे. कुठलाच आरोपी म्हणत नसतो हा स्क्रीनशॉट माझा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण, टाईप मी करत नाही तर...
जितेंद्र आव्हाड, रुपाली पाटील
Follow us on

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी, यासाठी बीडमध्ये शनिवारी मोर्चा निघाला होता. या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करत ते चॅट जितेंद्र आव्हाड यांचे असल्याचे दावा केला आहे. त्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच पोलिसांकडे तक्रारही केल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, शनिवारी माझे भाषाण संपले अन् व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाले. परंतु मी वापरत असलेला फोन आणि चॅटवरील सिग्नल वेगळे आहेत. तसेच माझा डिपी खरा नसून चुकीचा आहे. त्यासंदर्भात मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. माझ्या व्हॉट्सअ‍ॅप मराठी माझा खाजगी माणूस टाईप करतो. मी कधीच टाईप करत नाही. मी अजित पवार यांना एकेरी शब्द बोलत नाही. सन्मानाने मी अजित पवार साहेब बोलतो. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबाबत अॅट्रेसिटी लागू शकते. परंतु आता तर लहान मुले देखील मोबाईल एडिटिंग करत आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणतात, लोकांची घाणेरडी मानसिकता किती आहे, हे दिसत आहे. त्या चॅटमध्ये दलित मुसलमान असा उल्लेख आहे. हे दलित आणि मुस्लिम बाजारात विकत ठेवेल आहे का? किती जाती धर्मद्वेष या लोकांमध्ये भरला आहे.

हे सुद्धा वाचा

मलाही धमकीचा मेसेज

जितेंद्र आव्हाड यांनी आपणास व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज आला आहे. त्या संदेशात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यात त्याचा नंबरही आहे. आमदाराला धमकी दिली जात आहे. अजूनही माज उतरलेला नाही. पोलीस यंत्रणेचा काही धाकच उरला नाही. मी साहेबाच्या पक्षातील कार्यकर्ता आहे.

रुपाली पाटील यांची टीका

दरम्यान, रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला केला आहे. त्या म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड कसे काय सांगू शकतात तो स्क्रीनशॉट त्यांचा आहे की नाही. तो स्क्रीनशॉट खरा आहे. तो स्क्रीन शॉट जितेंद्र आव्हाडांचा आहे. कुठलाच आरोपी म्हणत नसतो हा स्क्रीनशॉट माझा आहे. कालच्या निषेध मोर्चातून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करण्यात आले.

राजकारणात माझ्यावर 32 केसेस होत्या. आता 33 वी केस आहे. जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. असे घाणेरडे गुन्हे तर आमच्यावर दाखल नाहीत. जितेंद्र आव्हाड सारखे राजकारणी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर तुम्ही एक गुन्हा दाखल केलात तुमच्यावर ही गुन्हे दाखल करते, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले.