नुसतं लकी असून चालत नाही रस्त्यावर उतरावे लागते, CM शिंदेचा ठाकरेंना टोला

| Updated on: Sep 06, 2024 | 7:03 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इतकी प्रसिद्ध झाली की विरोधकांना भीती आहे. अडीच वर्षात आम्ही राज्याला उद्योगक्षेत्रात पहिल्या क्रमाकांवर आणलं. बहीण लाडकी मुळे विरोधकांना धडकी भरली आहे. काम करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, फेसबूक लाईव्ह करुन चालत नाही असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला आहे.

नुसतं लकी असून चालत नाही रस्त्यावर उतरावे लागते, CM शिंदेचा ठाकरेंना टोला
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही ९ मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘सरकारमध्ये आल्यापासून १२२ प्रकल्पाना आम्ही मान्यता दिली. याआधीच्या सरकारने २ प्रकल्पही सुरु केले नव्हते. या राज्याला उद्योग क्षेत्रात पुढे नेण्याचं आमचं टार्गेट होतं. दावोसला गेलो होतो तेव्हा १ लाख ३७ कोटीचे एमओयू आम्ही साईन केले. आपल्याकडे स्कील आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आता ८४ हजार कोटींचे प्रकल्प सुरु होत आहे. मागितल्या शिवाय मिळत नाही. घरी बसून काही होत नाहीत. आम्ही योजना आणल्या याचा अभिमान आहे. लेक लाडकी लखपती आम्ही सुरु केली. लाडकी बहीण योजना सुरु केली. एसटीमध्ये सवलती दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याचं १० लाखांचं टार्गेट आहे.’

‘मला काय मिळेल ही अपेक्षा मी ठेवली नाही. काम केले की त्याची नोंद जनता ठेवत असते. मी जनतेला काय देईल असं माझं धोरण आहे. काम करत राहणार. विकास करत राहिल. सर्वसामान्य लोकांसाठी काम करत राहिल. आम्ही ६०० निर्णय घेतले. फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या योजना ठाकरेंनी बंद केल्या त्या आम्ही पुन्हा सुरु केल्या.’

‘जनता जनार्दन सगळं ठरवत असते. मला ाही वाटण्यापेक्षा जनतेला वाटलं पाहिजे. मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही वाद नाही. महायुतीचं सरकार येईल केलेल्या कामाची पोहोचपावती मिळेल. सगळे मिळून टीम म्हणून काम करत आहोत. लोकांची सरकारला पंसती आहे.’

‘मेहनत तर करावी लागते, नुसतं लकी असून चालत नाही. रस्त्यावर उतरावे लागते. लोकांच्या भावना समजावे लागते. पुरामध्ये जावे लागते. फेसबूक लाईव्ह करुन चालत नाही.मतभेद आणि मनभेद यात फरक आहे. मी टीमच्या कॅप्टन आहे. सगळे मिळून काम करत आहोत. लाडक्या बहि‍णींना याचं क्रेडिट देत आहोत. ही योजना सुरुच ठेवणार आहे. २ कोटी खात्यांमध्ये पैसे आम्ही दिले.’

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं तेच आहे. कार्यकर्त्ये काही करत असतील तर ही छोटी गोष्ट आहे. मी कधीही क्रेडिट घेत नाही. सरकार पडेल असं म्हणत होते. यांना खरा ज्योतिष काही मिळाला नाही. मी आरोपांना उत्तर कामाने दिलं. मी पहाटेपर्यंत काम करतो याचं मला समाधान आहे. जनतेला काय आवडतं ते देण्याचं काम सरकारचे आहे. ही शॉर्टकट योजना नाही. त्याच्या पैशांची तरतूद केली आहे. पुन्हा जनतेसमोर जायचे आहे.’

‘आम्ही जे बोललो ते करणार. शब्द देतांना बाळासाहेब म्हणायचे विचार करुन शब्द द्या. लाडक्या बहि‍णींना आम्ही आधार दिला. लाडक्या बहीण विरोध करणाऱ्यांना बरोबर धडा शिकवतील.’