महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या जागांपैकी कल्याण ग्रामीण मतदारसंघाची जागा आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तीन ताकदवान उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील जिंकून आले होते. राजू पाटील हे राज्यातील मनसेचे एकमेव आमदार ठरले होते. राजू पाटील यांची गेल्या पाच वर्षात लोकप्रियता देखील वाढली आहे. राजू पाटील हे बेधडकपणे विविध मुद्द्यांवर भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग मतदारसंघात आणि महाराष्ट्रात निर्माण झालाय. पण कल्याण ग्रामीणच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून देखील तितक्याच ताकदीचे उमेदवार देण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली.
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सुभाष भोईर हे 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर जिंकून आले होते. पण 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचं तिकीट कापून रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना दिलं होतं. अटीतटीच्या लढतीत गेल्या निवडणुकीत राजू पाटलांचा विजय झाला होता. त्यानंतर कल्याण ग्रामीणच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी आपला हुकमी एक्का सुभाष भोईर यांना मैदानात उतरवलं. सुभाष भोईर यांना या निवडणुकीत सहानुभूतीचा मोठा फायदा होताना दिसला. मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत मशालची चर्चा सुरु होती. असं असलं तरी राजू पाटील यांच्याविषयी देखील तशीच चर्चा होती. तसेच शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांच्याबाबत चर्चा होती.
कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक निकाल 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting
विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE