मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे (करुणा शर्मा) यांनी उडी घेतली आहे. “जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?”, असा खणखणीत सवाल करुणा शर्मा यांनी फेसबुकवर केला आहे. “आम्ही न्याय मागतो, भीक नाही. पूजा चव्हाण यांची आत्महत्या की हत्या याची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे”, असंदेखील करुणा शर्मा म्हणाल्या आहेत (Karuna Dhananjay Munde on Pooja Chavan Suicide case).
करुणा शर्मा यांनी जीवन जो सामाजिक संस्थेचे काही बॅनर फेसबुकवर शेअर केले आहेत. या संस्थेचं आपण महाराष्ट्र महिला अध्यक्ष असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्याचबरोबर संबंधित बॅनरवर पूजा चव्हाणला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. “आम्ही न्याय मागतो, भीक नाही”, असंदेखील बॅनरवर म्हटलं आहे (Karuna Dhananjay Munde on Pooja Chavan Suicide case).
करुणा शर्मा किंवा करुणा धनंजय मुंडे हे जाणून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला या प्रकरणाच्या अगदी खोलात जावं लागेल. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने गेल्या महिन्यात पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा यांच्या आरोपांनुसार 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरु आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. करुणा शर्मा या तक्रारदार रेणू शर्मा यांच्याच मोठी बहीण आहेत.
धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट
रेणू शर्मा यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली. त्यांनी फेसबुकवर मांडलेल्या भूमिकेत रेणू शर्मा या तरुणीची मोठी बहीण करुणा शर्मा या महिलेसोबत परस्पर सहमतीने 2002 सालापासून संबंधात असल्याची कबूली दिली होती. त्याचबरोबर करुणा शर्मा यांच्यापासून आपल्याला दोन मुलंदेखील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबादारी आपण घेतल्याची त्यांनी सांगितलं होतं.
धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्टमध्ये रेणू शर्मा यांचा बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.
करुणा शर्माचं फेसबुकवर करुणा धनंजय मुंडे नावाचं अकाउंट
दरम्यान, करुणा शर्मा या महिलेने फेसबुकवर करुणा धनंजय मुंडे नावाचं अकाउंट आहे. या अकाउंटवर त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासबोतचे फोटो देखील शेअर केले आहेत.
पूजा चव्हाण प्रकरण नेमकं काय?
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. या क्लिपमधील आवाज शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संबंधित बातमी :
दिशासोबत जे झालं तेच पूजासोबत होणार असेल तर ‘शक्ती कायदा’ चाटायचाय?; नितेश राणे संतापले
वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा : चित्रा वाघ
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजप आक्रमक; संजय राठोड नॉट रिचेबल