नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना धडक

| Updated on: Jul 14, 2024 | 3:04 PM

accident in kasara ghat: नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात रविवारी भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना कंटनेरने धडक दिली. या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातात काही प्रवाशी जखमी झाले.

नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना धडक
accident in kasara ghat
Follow us on

नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात रविवारी भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना कंटनेरने धडक दिली. या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वीकेंडमुळे कसारा घाटामध्ये आज वाहनांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

अशी घडली घटना

नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. या घाटात जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहे. त्यानंतर घाटातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली. अन्यथा कसारा घाटात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत होते. रविवारी वीकेंडमुळे वाहनांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. त्याचवेळी नवीन कसारा घाटात विचित्र अपघात झाला. घाटातून जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर अनियंत्रीत झालेल्या कंटनेरने सहा ते सात गाड्यांना धडक दिली. या धडकेमुळे त्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यातील काही जण जखमी झाले. तसेच या अपघातात एकूण 13 ते 14 प्रवासी जखमी झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाहतूक ठप्प, पोलीस घटनास्थळी

अपघातानंतर घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहचली. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले. तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु झाले.

हे सुद्धा वाचा

शनिवारी दरड कोसळली

नवीन कसारा घाटात शनिवारी सायंकाळी दरड कोसळली होती. सुदैवाने ज्या वेळेस दरड कोसळली त्या वेळेस कोणतेही वाहन पास झाले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हेल्पलाईनला मेसेज गेल्यावर रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अवघ्या पंधरा मिनिटात दगड बाजूला करून एक लेन वाहतूक सुरळीत केली. खबरदारीचा उपाय म्हणून दरडीच्या आजूबाजूला ब्यारीगेटिंग करण्यात आले होते.