Kasbapeth election : कसबापेठ मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांना कोण देणार टक्कर?

| Updated on: Oct 30, 2024 | 7:15 PM

कसबापेठ विधानसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. येथे २८ वर्ष भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Kasbapeth election : कसबापेठ मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांना कोण देणार टक्कर?
Follow us on

Kasbapeth Assembly election : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारांची यादी ही जाहीर झाली आहे. जवळपास सर्वच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांकडून प्रचार ही सुरु झाला आहे. सगळ्याच नेत्यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. २०२४ ची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ देखील चर्चेत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला निवडून देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. २८ वर्षांपासून येथे भाजपाचे वर्चस्व होते. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट हे आमदार होते. त्यांच्यानंतर २०१९ मध्ये मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या. पण २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे धंगेकर विजयी झाले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून कसबा विधानसभा मतदारसंघामधून हेमंत रासणे रिगंणात आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून पुन्हा रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत. भाजपकडून कुणाल टिळक, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील इच्छूक होते.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आधी ओबीसी मतदारांचे वर्चस्व होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार येथे एकूण 2 लाख 90 हजार 724 मतदार आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या अंदाजे 27 हजार 864 इतकी आहे, जी एकूण मतांच्या 9.63 टक्के आहे. याशिवाय 42 हजार 823 मुस्लीम मतदार आहेत, म्हणजे एकूण मतांच्या 14.8 टक्के.

२०२३ पोटनिवडणुकीचा निकाल

 उमेदवार  पक्ष  मतदान
रविंद्र धंगेकर काँग्रेस 73,309
हेमंत रासणे भाजप 62,394

२०१९ चा निकाल

 उमेदवार  पक्ष  मतदान
मुक्ता शैलेश टिळक भाजप 75,492
अरविंद शिंदे काँग्रेस 47,296

२०१४ चा निकाल

 उमेदवार  पक्ष  मतदान
बापट गिरीश भालचंद्र भाजप 73,594
डॉ. रोहित दीपक टिळक काँग्रेस 31,322
धनंजकर रवींद्र हेमराज मनसे 25,998

२००९ चा निकाल

 उमेदवार  पक्ष  मतदान
गिरीश बापट भाजप 54,982
धंगेकर रवींद्र हेमराज मनसे 46,820
रोहित दीपक तिलक काँग्रेस 46,728

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार

2023: रवींद्र धंगेकर, काँग्रेस
2019: मुक्ता टिळक, भारतीय जनता पार्टी
2014: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष
2009: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष
2004: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष
1999: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष
1995: गिरीश बापट, भारतीय जनता पक्ष
1991 पोटनिवडणूक : वसंत विठोबा थोरात, काँग्रेस
1990: अण्णा जोशी, भारतीय जनता पक्ष
1985 : उल्हास काळोखे, काँग्रेस
1980: अरविंद लेले, भारतीय जनता पक्ष
1978: अरविंद लेले, जनता पक्ष
1972: लीलाबा मर्चंट, काँग्रेस
1967: आर. व्ही. तेलंग, काँग्रेस
1962: बाबुराव सणस, काँग्रेस