नाशिकः लसीकरणाला गती मिळावी म्हणून राज्य सरकारने कवच कुंडल मोहीम सुरू केली. मात्र, हुबेहुब अशाच मोहिमेचा शुभारंभ आज केंद्र सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पेगलवाडी येथून करण्यात येत आहे. त्यामुळे या मोहिमा एकमेकांविरुद्ध उभ्या टाकल्याचे चित्र राज्यात तरी निर्माण झाले आहे. यातली नेमकी कोणती लसीकरण मोहीम राबवायची, असा पेच आरोग्य कर्मचाऱ्यांना पडला आहे.
देशात 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देणे सुरू झाले. प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर व नंतर 1 मे 2021 पासून सर्व 18 वर्षावरील व्यक्तींना हे लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला जनतेचा मनातील संभ्रम व लसीची भीती यामुळे डोस घेण्याचे प्रमाण जरी कमी असले, तरी लस सुरक्षित व लाभदायक असल्याचे समजल्यामुळे हळूहळू कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र अनेक शहरात अनेकदा दिसून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने घातलेले थैमान आणि तिसऱ्या लाटेची टांगती तलवार हे पाहता राज्य सरकारने कवच कुंडल मोहीम सुरू केली. त्यानुसार राज्यात लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न केला. गावनिहाय लस न घेतलेले, पहिला डोस घतलेले आणि दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांची यादी काढली. अनेक ठिकाणी घरोघरी जावून लसीकरण सुरू केले. त्यामुळे लसीकरणाला गती मिळाली. यात आरोग्य कर्मचारी झोकून देऊन काम करत आहेत. मात्र, आता नेमकी याच वेळी केंद्र सरकारने हर घर दस्तक अभियान सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी गावातून या मोहिमेची सुरुवात होत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. हर घर दस्तक मोहिमेचे उद्दीष्टही कवच कुंडल मोहिमेसारखेच आहे. मग कर्मचाऱ्यांनी कोणती मोहीम राबवायची असा प्रश्न त्यांना पडला आहे.
नाशिकमध्ये विक्रमी लसीकरण
महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपर्यंत 9 कोटी 43 लाख 21 हजार लसीकरणाचे डोसेस दिलेले असून 18 वर्षे वरील वयोगटात 70% पहिला डोस व 29% दुसरा डोस पूर्ण केले आहेत, त्यात नाशिक विभागाचा विक्रमी वाटा आहे. नाशिक विभागात तब्बल 1,29,34,893 डोसेस देऊन कोरोना महामारीस संरक्षक ठरेल असे लसीकरण झाले आहे आणि यासाठी आरोग्य विभागास जनतेचा व लोकप्रतिनिधींचा सहभागामुळेच इतके लसीकरण पूर्ण करणे शक्य झाले आहे.पुढेही असाच चढता आलेख राहील, असा आरोग्य यंत्रणेस विश्वास आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 45 लाख 12 हजार 691 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये 32 लाख 90 हजार 262 जणांनी पहिला डोस घेतला असून 12 लाख 22 हजार 429 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. (‘Kavach Kundal’ vs. ‘Har ghar dastak’; Which vaccination campaign to carry out, health workers in the state confused)
इतर बातम्याः
22 हजार कोटींच्या विमान प्रकल्पासाठी भुजबळांच्या पायघड्या; नाशिकमध्ये येण्याचे टाटांना आवतन!
ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपने 234 कोटींच्या रस्ते कामाचा नारळ फोडला!
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021