विधानसभेआधीच पवारांचा करेक्ट कार्यक्रम कोल्हापुरातून, आले आणि मुश्रीफांना टेन्शन देऊन गेले

| Updated on: Sep 03, 2024 | 7:35 PM

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेआधीच शरद पवारांनी कोल्हापुरात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. शरद पवार यांनी एकाच बाणातून दोन निशाणे साधले आहेत. त्यामुळे त्यांच्या या राजकीय खेळीची सर्वसामान्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे.

विधानसभेआधीच पवारांचा करेक्ट कार्यक्रम कोल्हापुरातून, आले आणि मुश्रीफांना टेन्शन देऊन गेले
विधानसभेआधीच पवारांचा करेक्ट कार्यक्रम कोल्हापुरातून
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक असणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कारण राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे या दोन पक्षांचे आता तब्बल चार पक्ष झाले आहेत. पण या फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला राज्यात लोकसभा निवडणुकीत फटका बसला आहे. यानंतर राज्यात दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापुरातून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. शरद पवारांनी कोल्हापुरात येऊन मंत्री हसन मुश्रीफ यांचं टेन्शन वाढवलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसू नये यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सारख्या महत्त्वकांक्षी योजनांची घोषणा होत आहे. दुसरीकडे विरोधकही मागे हटताना दिसत नाहीत. विरोधकांकडून सरकारमधील पक्षांना धक्क्यावर धक्के देणे सुरुच आहेत. कोल्हापुरातील कागलमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महायुतीला तसाच मोठा राजकीय धक्का दिला आहे.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले. शरद पवार यांची कोल्हापूरच्या गैबी चौकात जाहीर सभा पार पडली. शरद पवारांनी या दौऱ्यातून कोल्हापुरात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. कारण शरद पवारांनी एकाच बाणातून दोन निशाणे मारले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी भाजप नेते समरजित घाटगे यांना आज आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे भाजपला कागलमध्ये धक्का बसला आहे. तसेच कागलचे विद्यमान आमदार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजित घाटगे यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट देण्याचे संकेत दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे यामुळे हसन मुश्रीफ यांचं टेन्शन वाढणार आहे. हसन मुश्रीफ या मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीवेळी समरजित घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी समरजित घाटगे यांनी मुश्रीफांना प्रचंड टफ फाईट दिली होती. आता समरजित घाटगे यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी असणार आहे. त्यामुळे मुश्रीफांसाठी ही निवडणूक जास्त आव्हानाची असणार आहे.