कोल्हापूरातील गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर अशा तीन तालुक्यांचा हा करवीर विधानसभा मतदार संघ आहे. कोल्हापूरातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जात आहे.साल 2019 मध्ये येथे कॉंग्रेसचे पी. एन.पाटील यांचा विजय झाला होता. मागच्या दोन निवडणूकात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यंदा स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे पूत्र राहुल पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यात मुख्य लढत होणार आहे. लोकसभा निवडणूकीत याच मतदार संघातून शाहू महाराज यांना 70 हजाराचे लीड मिळाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत या मतदार संघात काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे. करवीर विधानसभा निकाल ( 2014 )
उमेदवाराचे नाव | पक्षाचे नाव | एकूण मते |
---|---|---|
चंद्रदीप नरके | शिवसेना | 1,07,998 |
पी.एन.पाटील | कॉंग्रेस | 1,07,288 |
राजू सुर्यवंशी | जनसुराज्य शक्ती | 18,964 |