कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले असून यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार जयश्री जाधव यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे कोल्हापुरात सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. या विजयानंतर जयश्री जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा विजयाचे श्रेय आपण कुणाला देणार असा प्रश्न विचारला. यावेळी महाविकास आघाडी सत्ता, बंटी साहेब (सतेज पाटील), हसन मुश्रीफजी आदीसह स्वाभिमानी जनतेला मी हे श्रेय देते, अशी भावना जयश्री जाधव यांनी व्यक्त केली.
अत्यंत अटीतटीच्या या लढतीय विजयी ठरलेल्या जयश्री जाधव यांनी विजयी प्रतिक्रिया नोंदवली. या यशाचे श्रेय कुणाला जाते या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘ महाविकास आघाडी सत्ता, बंटी साहेब, मुश्रीफ, मधुनिमा राजे, मालोजीराजे, पूर्ण अधिकारी, पदाधिकारी, सबंध स्वाभिमानी जनता, सगळे नगरसेवक यांना देते. त्यांच्यामुळेच हा विजय मिळाल्याचे त्या म्हणाल्या. आता विजयी झाल्यानंतर जनतेच्या सेवेत रूजू होणार असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदार संघात ही पोटनिवडणूक लावण्यात आली होती. खरं तर ही निवडणूक होऊच नये, अशी विनंती करण्यात आली होती. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना आमदारकी मिळवण्याचे प्रयत्न झाले. मात्र भाजपने पोटनिवडणूक झालीच पाहिजे, असा आग्रह धरल्यानंतर येथे मतदान घेण्यात आले. यात तीन पक्षांच्या आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.
इतर बातम्या-