माझी लाडकी बहीन योजना जाहीर झाल्यापासून राज्यभरात ती चांगलीच गाजली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. महिला रांगेत उभे राहून या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या २१ वर्षांवरील ते ६५ वर्यापर्यंतच्या सर्व महिलांना मिळणार आहे. माझी लाडकी बहीन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर, या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना १५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. परंतु काही अशा महिला आहेत ज्यांना थेट 4500 रुपयांचा लाभ मिळू शकतो. माझी लाडकी बहिन योजनेसाठी याआधी अॅप आणि ऑनलाईन अर्ज करता येत होते. पंरतू आता सरकारने ही सेवा बंद केली आहे. त्याऐवजी अंगनवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाली होती, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख 31 जुलै होती. परंतु नंतर वाढता प्रतिसाद पाहता सरकारने मुदत वाढवली होती. ती आता 31 सप्टेंबर करण्यात आली आहे. ज्या बहिणींना आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकले नसतील तर अशा महिलांना अजूनही अर्ज करण्याची मोठी संधी आहे. कारण तुम्हाला तर आधीचे दोन हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला थेट 4500 रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्व भगिनींना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच दरवर्षी ३ एलपीजी गॅस सिलिंडर देखील मोफत दिले जाणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्व बहिणींंना आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबत बहिणीचे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, यांपैकी एक (१५ वर्षापूर्वीचे असणे आवश्यक आहे). ज्या विवाहित महिलांचे नाव शिधापत्रिकेवर नाही, आणि नवविवाहित आहेत, त्या उत्पन्नाच्या पुराव्याच्या जागी पतीचे शिधापत्रिका सादर करू शकतात. यासोबत आधारशी जोडलेले बँक खाते द्यावे लागेल. सर्वांना सोबत हमीपत्र आणि फोटो द्यावा लागेल.
लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी 14 ऑगस्ट 2024 रोजी सर्व भगिनींना दोन हप्ते जोडून 3000 रुपये पाठविण्यात आले असले तरी अजूनही अशा महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नसेल, किंवा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रित 4500 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.