‘लाडका भाऊ योजने’साठी ‘ही’ कागदपत्रं आवश्यक? लगेचच पाहा यादी

| Updated on: Jul 17, 2024 | 1:00 PM

आता 'लाडका भाऊ' योजना नेमकी काय आहे, यासाठी कोणकोण पात्र असणार, यासाठी कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार याची माहिती समोर आली आहे.

लाडका भाऊ योजनेसाठी ही कागदपत्रं आवश्यक? लगेचच पाहा यादी
Follow us on

Ladka Bhau Yojana Document list : महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता ‘लाडका भाऊ’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे. आता ‘लाडका भाऊ’ योजना नेमकी काय आहे, यासाठी कोणकोण पात्र असणार, यासाठी कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार याची माहिती समोर आली आहे.

बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी योजना

मुख्यमंत्री ‘लाडका भाऊ’ योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘लाडका भाऊ’ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल.

मूळचा महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती असणं गरजेचं

‘लाडका भाऊ’ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ‘लाडका भाऊ’ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक असणार आहे.

हे सुद्धा वाचा

‘लाडका भाऊ’ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक?

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • बँक खाते पासबुक
  • ई-मेल आयडी

‘लाडकी बहीण’ योजनेनंतर लाडक्या भावांसाठी योजना

दरम्यान अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. बहि‍णींसाठी योजना, मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी त्यावेळी उपस्थित केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठीदेखील योजना आणली आहे.