राज्यातील किती महिलांच्या खात्यात आले लाडकी बहीण योजनेचे पैसे? इतरांच्या खात्यात कधी येणार?

| Updated on: Aug 18, 2024 | 7:42 AM

Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली. त्याचा आनंद आहे. आता 17 तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहोत. अनेक टीका झाल्या पण बुधवारी 35 लाख माय बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले. तसेच आज आणि उद्या 50 लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर आम्ही पैसे देणार आहोत.

राज्यातील किती महिलांच्या खात्यात आले लाडकी बहीण योजनेचे पैसे? इतरांच्या खात्यात कधी येणार?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 17 ऑगस्ट 2024 ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यापूर्वी 15 ऑगस्टचे निमित्त साधत राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील किती महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली. त्यानुसार राज्यातील 35 लाख भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. तसेच महिन्याअखेर सव्वा कोटी महिल्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले.

1.25 कोटी महिलांच्या खात्यात

पुण्यात सिंहगड रोडवरील पुलाच उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले. त्यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातही माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली. त्याचा आनंद आहे. आता 17 तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहोत. अनेक टीका झाल्या पण बुधवारी 35 लाख माय बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले. तसेच आज आणि उद्या 50 लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर आम्ही पैसे देणार आहोत. ‘बोले तैसा चाले त्याची वांदावी पाऊले’, असे आमचे सरकार आहे.

सिंहगड रोड पूल पुणेकरांना भेट

पुणेकरांना सिंहगड रोड उड्डाण पूल म्हणजे एक अपूर्व भेट आहे. यामुळे पुण्यात वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आम्ही पुणेकरांची वाहतूक कोंडीतून कशी सुटका करता येईल, यासंदर्भात सातत्याने विचार करत आहोत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेगळे काय करता येईल, यावर आम्ही चर्चा करत असतो. सगळ्या संस्थांना एकत्र करून यावर चर्चा करून मार्ग काढत आहोत.

हे सुद्धा वाचा

शहरात मेट्रोचे जाळे

नितीन गडकरी यांनी देखील पुण्याला अनेक मोठे प्रकल्प दिले आहेत. चांदणी चौकातला पूल तयार झाला आहे. पण त्यावरुन जे मार्ग गेले किंवा रस्ते गेले त्यावरून पुणेरी टोमणे असलेल्या पाट्या पहिला मिळतात. मेट्रोच काम वेगाने सुरू आहे. शहराच्या चारी बाजूंनी मेट्रो करायची आहे. अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. लोकांना याचा त्रास होतो. आजचा कार्यक्रम सकाळी घेण्याचे कारण लोकांना त्रास होऊ नये, हाच आहे. सकाळी दहानंतर लोक बाहेर पडतात. मग एकदा लोक बाहेर पडायला लागले आणि आपल्या कार्यक्रमामुळे वाहतूक कोणी झाली की लोक मनातल्या मनात आपल्याला शिव्या घालतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत ही आमची सगळ्यांची इच्छा आहे.