Ladki Bahin Yojana : आता त्या महिलांना पण मिळणार पैसे, महायुतीच्या मंत्र्याने दिली योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

| Updated on: Apr 04, 2025 | 6:15 PM

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : आता त्या महिलांना पण मिळणार पैसे, महायुतीच्या मंत्र्याने दिली योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट
ladki bahin yojana
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अमलंबजावणीला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण 9 हाप्ते लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेबाबत आता उलट -सुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान आम्ही पुन्हा जर सत्तेत आलो तर या योजनेतील लाभार्थी महिलांच्या हाफ्त्यामध्ये वाढ करू त्यांना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये दर महिन्याला देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. दरम्यान राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं मात्र अजूनही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळालेले नाहीत, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज लावण्यात येत होता, मात्र याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

यावर आता मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हाप्ते मिळालेले आहेत. जे रखडले आहेत, ते पुढच्या महिन्यात येऊन जातील. या योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या, त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत, त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल, असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं आहे. एप्रिलचा हाप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.