मुंबई : महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आज सकाळपासूनच महाराष्ट्र बंदचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या अगदीच नगण्य आहे. भाजी मार्केट वगळता इतरत्र गर्दीही दिसत नाहीय. मुंबई लोकलही सुरळीतपणे सुरु आहे. याउलट बेस्ट बस, पुणे पीएमपीएमएल आणि खाजगी वाहतूकही बंद आहे. त्याचवेळी राज्यात अत्यावश्यक सेवेवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.
या महाराष्ट्र बंदला पुणे-मुंबई-ठाण्याच्या व्यापाऱ्यांनी रविवारी दुपारपर्यंत विरोध केला होता. व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबई व्यापारी संघटनेचे विरेन शहा यांनी एक पाऊल मागे घेत सोमवारी दुपारी 4 पर्यंत दुकाने बंद ठेवणार असल्याची घोषणा केली.
ते म्हणाले की, ‘विविध भागातील व्यापाऱ्यांकडून आणि स्थानिक पातळीवर देखील फोन येत आहेत, शिवसेना आणि महा विकास आघाडीशी संबंधित पक्षांचे नेते व्यापाऱ्यांना बंदमध्ये पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत दुकाने दुपारी 4 पर्यंत बंद ठेवून त्यांना पाठिंबा दिला जाईल आणि दुपारी 4 नंतर दुकाने उघडली जातील. मुंबईच्या व्यापाऱ्यांनंतर पुण्याच्या व्यापारी संघटनेनेही संध्याकाळपर्यंत बंदला पाठिंबा जाहीर केला, पण पुण्याचे किरकोळ व्यापारी दुकाने उघडण्यावर ठाम आहेत. नागपूर आणि औरंगाबादच्या व्यापारी संघटनेने दुकाने उघडण्याची घोषणा केली आहे.
मुंबई-ठाणे आणि परिसरातील लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे नवी मुंबईची एपीएमसी बाजारपेठ आज बंद आहे. नवी मुंबईतून मुंबई आणि जवळपासच्या भागात पुरवला जातो. पुणे बाजार समितीही बंदमध्ये सहभागी होणार आहे. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही बंदमध्ये सहभागी होणार आहे. याशिवाय नाशिक लासलगाव, धुळे, नंदुरबार, मनमाड, बारामती बाजार समितीची बाजार समिती (कांदा बाजार) बंद राहील. त्यामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. परंतु राज्यभरातील रुग्णालये, औषध दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा बंदच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत.
Maharashtra: Maha Vikas Aghadi that comprises of Congress, Shiv Sena, and NCP has called for a statewide bandh today in protest against the Lakhimpur Kheri violence that claimed the lives of 8 people including 4 farmers
Visuals from Bandra Reclamation area in Mumbai pic.twitter.com/57yOFikZLv
— ANI (@ANI) October 11, 2021
मुंबईच्या डब्बावाल्यांनीही बंदला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. ते शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी काळी पट्टी बांधतील पण बंदमध्ये सहभागी असणार नाहीत. राज ठाकरे यांची मनसेही बंदमध्ये सहभागी असणार नाहीय. ‘राजकीय पक्षांचे राजकारण सुरू होऊ द्या, पण चित्रपटांचे शूटिंग थांबणार नाही’ असं मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं. आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देतो पण शूटिंग बंद ठेवण्याचा आर्थिक भार सहन करणे आता चित्रपट उद्योगातील कर्मचाऱ्यांना असह्य झालंय, असंही त्यांनी म्हटलं.
काय सुरु?
मुंबई लोकल
डबेवाल्यांची सेवा
सरकारी ऑफिसेस
हॉस्पिटल, मेडिकल
भाजीपाल्याची दुकाने
अत्यावश्यक सेवा
काय बंद?
खाजगी आस्थापना
विविध मार्केट कमिटी
बेस्ट आणि पीएमपीएमएल सेवा
खाजगी वाहतूक
हे ही वाचा :
बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच यांचा ‘चंदा’, आशिष शेलारांचा हल्लाबोल