Gunaratna sadavarte | ‘राज ठाकरे वन टू वन येऊ दे, मग मी काय ते…’ सदावर्तेंकडून मनसेला थेट चॅलेंज

| Updated on: Jan 27, 2024 | 1:31 PM

Gunaratna sadavarte | मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना गुणरत्ने सदावर्ते यांची गाडी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घसरली. राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंच कर्तुत्व काय? असं गुणरत्ने सदावर्ते बोलून गेले.

Gunaratna sadavarte | राज ठाकरे वन टू वन येऊ दे, मग मी काय ते... सदावर्तेंकडून मनसेला थेट चॅलेंज
Gunaratna sadavarte-raj thackeray
Follow us on

Gunaratna sadavarte | मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चॅलेंज देऊन टाकलं. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावरही बोचरी टीका केली. गुणरत्ने सदावर्ते यांना पत्रकारांनी विचारलं की, तुमच्या सुरक्षेवर जो खर्च होतोय, त्यावर मनसेने आक्षेप घेतलाय. या आरक्षण आंदोलनामुळे तुमची सुरक्षा वाढवण्यात आली. तुमच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख रुपये खर्च होतो, तुम्ही सरकारचे जावई आहात का? असा प्रश्न मनसेने विचारलाय. त्यावर उत्तर देताना गुणरत्ने सदावर्ते यांनी थेट राज ठाकरेंना चॅलेंज केलं.

“राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंच कर्तुत्व काय? राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो, तर मी बरच बोलू शकतो. पण आज तो विषय नाही, आज ती वेळ नाही. त्यांनी टोल नाके बघावेत, सरकारला शहाणपण शिकवू नये. माझ्यावर टीका करण्याऐवढे ते मोठे नाहीत” असं गुणरत्न सदावर्ते बोलले.

….तर मी रागवणार नाही

“राज ठाकरे आणि मी वन टू वन, समोरा समोर येऊ द्या, मी काय ते सांगतो?. छोटे नेते, कार्यकर्ते बोलत असतील, तर मी रागवणार नाही” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. राज्य सरकारने अध्यादेश काढून मराठा आरक्षणाचा हा जो निर्णय घेतलाय, त्याला गुणरत्ने सदावर्ते कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.