ओबीसी समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन वाद घातल्याचा आरोप काही तरुणांनी केला आहे. लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करुन वाद घातल्याचा दावा मराठा तरुणांनी केलेला आहे. हाके यांनी आरक्षणाच्या वादावरुन धमकी आणि दमदाटी केल्याचा आरोपही मराठा तरुणांनी केला आहे. दोन महिन्यांनी मारुन टाकू, अशी धमकी लक्ष्मण हाके यांनी दिल्याचा आरोप होतोय. लक्ष्मण हाके यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत लक्ष्मण हाके हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ हा पुण्यातला आहे. पुण्यात काही मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं. यावेळी लक्ष्मण हाके यांनी
मराठा तरुणांच्या दाव्यानुसार, पुण्यातील एका टेकडीवर लक्ष्मण हाके आपल्या काही सहकाऱ्यांसह बियर पित बसले होते. यावेळी तिथून जात असणाऱ्या मराठा आंदोलकांची लक्ष्मण हाके यांच्यावर नजर पडली. यावेळी त्या आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना गाठत तुम्ही माजी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर खालच्या पातळीची टीका का केली? असा जाब विचारला. यावेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, संबंधित व्हिडीओची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही.
लक्ष्मण हाके यांनी यानंतर काही लोकांना फोन करुन बोलावून घेतलं आणि मराठा तरुणांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला. त्यानंतर मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके पोलीस स्टेशनला पोहोचले. मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला. तसेच आपण पोलिसांकडे लक्ष्मण हाके यांनी दारु पिली आहे का? याचा तपास करण्याची मागणी केली.
दरम्यान, संबंधित घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके मद्यधुंद दिसत आहेत. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात मीडिया प्रतिनिधी पोहोचले. त्यांनी काय घडलं याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी पत्रकारांना अरेरावी केली.