मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : मुंबईत काल दहीहंडी फोडताना दिवसभरात 107 गोविंदा जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच. उपोषणाचा आज अकरावा दिवस. जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार. मुंबईसह ठाण्यात सकाळपासून संततधार. दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, दादा भुसे उपस्थित होते. तसेच नारायण कुचे, प्रवीण दरेकर, अर्जुन खोतकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भरत गोगावले, राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, मुख्य सचिव उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजासाठी केलेल्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती दिली गेली. तसंच पुढील कार्यवाहीसंदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
मुबई : सह्याद्री अतिथी गृहामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मराठा समाजाला सरसकट आरक्षण संदर्भात बैठक सुरू आहे. अंतरवाली सराटी या गावातील उपोषण स्थळावरून मुंबई सहयाद्रीमध्ये सुरू असलेल्या बैठकीची इस्त्यंभूत माहिती आपल्या मोबाईलवरून जरांगे पाटील घेत आहेत. तिथे होत असलेली चर्चा ते एका कागदावर लिहून घेत आहेत.
मुंबई | मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ सह्यागद्री अतिथीगृहावर दाखल झालंय. या शिष्टमंडळाची लवकरच बैठक पार पडणार आहे.
मुंबई | कांदिवली पश्चिमेतील रोडवर लावलेले बेकायदेशीर बॅनर पोस्टर हटवण्यासाठी आज बीएमसीचे अधिकारी गेले असता शिंदे गटाचे शाखाप्रमुख प्रकाश गिरी यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना मारहाण केली. या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी प्रकाश गिरीविरोधात एफआयआर नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पुणे | पुण्यातील चांदणी चौकात मुंबई-बंगळूरू महामार्गावर वाहतूक कोंडी निर्मण झालीय. साताराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालीय. चांदणी चौकातील पुलाचं काम करूनही वाहतूक कोंडी सुटली नाही. आमदार सत्यजित तांबेंनी वाहतूक कोंडीचा व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. शहरात जाणाऱ्या मार्गावरही वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरु झाली आहे. जो बायडन दिल्लीत दाखल झाले. बायडेन त्यानंतर दिल्ली विमानतळावरुन थेट पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी पोहचले.त्यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरु झालीय. भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. जो बायडेन यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेते हे जी 20 परिषदेसाठी राजधानी दिल्लीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भेट
PHOTO | PM Narendra Modi holds bilateral meeting with US President Joe Biden.#G20SummitDelhi #G20India2023 pic.twitter.com/t64FMhQHuq
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2023
मुंबई | मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे. जरांगेच्या शिष्टमंडळाची बैठक ही रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे. मुंबईला रवाना होण्याआधी शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगर विमानतळावर बैठक झाली. सरकारसोबतच्या बैठकीत नक्की काय भूमिका मांडायची याबाबत चर्चा झाली. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला सरकारकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत.
मुंबई | इर्शाळवाडी दुर्घटनेत 57 जणांचा शोध लागला नाही. राज्य सरकारने त्या 57 जणांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्या 57 जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख आणि राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे एकूण प्रत्येकाला 5 लाख रुपये हे सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मदत-पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे अशक्य असल्याचे विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. आता यावर इतर नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
कल्याण पोलिसांनी नुकताच मोठी कारवाई केली आहे. लोकांना दहशत दाखवण्यासाठी कमरेला गावठी कट्टा लावून बुलेट गाडीवर फिरणाऱ्याला अटक करण्यात आलीये. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचत कल्याण स्टेशन परिसरातून अटक केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात रिक्षाने प्रवास केला आहे. आज पुण्यात काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेदरम्यान चव्हाणांनी रिक्षा प्रवास केला आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत यांनी नुकताच मोठे भाष्य केले आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले, मला असे वाटतंय यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही संवेदनशील आहेत. ओबीसीच्या बाबतीतही सरकार संवेदनशील आहे.
पंकजा मुंडे तुळजापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. तुळजाभवानी मातेचे घेणार दर्शन त्या घेत आहेत. शिवशक्ती यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. तुळजापुरातील अंबाबाईचे दर्शन घेऊन पंकजा धाराशिव मुक्कामी जाणार आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतात दाखल झाले आहेत. जो बायडन नवी दिल्ली विमानतळावर स्पेशल विमानाने दाखल झाले आहेत. बायडन जी 20 परिषदेत सहभागी होण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे बायडन यांची आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे.
यवतमाळ : माहेश्वरी समाजात प्री वेडिंग शूटवर बंदी लादण्यात आली. यवतमाळ जिल्हा माहेश्वरी समाजाच्या बैठकीत असे निर्देश दिले गेलेत. समाजाचे अध्यक्ष मनोहर लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय माहेश्वरी महासभेच्या निर्देशाने प्री वेडिंग शूटवर बंदीचा निर्णय घेण्यात आला. माहेश्वरी समाजातील लग्न जुळलेल्या युवक-युवतींना प्री वेडिंग शूट करता येणार नाही.
काँग्रेसची जनसंवाद यात्रा मुक्ताईनगरमध्ये दाखल झाली. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तळागळापर्यंत पोहचण्याबाबत यात्रा काढली आहे. मुक्ताईनगरमध्ये आज ही यात्रा दाखल झाली. यात मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या मागणीसाठी कुणबी समाजाचे नेते आक्रमक आहे. आम्ही उद्यापासून संविधान चौकात आंदोलन करणार असं भाजप नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे म्हणाले. या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहोत, असं कोहळे यांनी सांगितलं.
गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला आहे. गंगापूर धरण परिसरात मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरीला पूर न गेल्याने गोदावरी नदी पात्रा लगतच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
मराठा आरक्षणासंबंधी पुढील चर्चेसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल होणार आहे. 5 सदस्यीय शिष्टमंडळ पुढील चर्चेसाठी मुंबईत दाखल होत आहे. आज रात्री 10:30 वाजता हे शिष्टमंडळ मुंबईत दाखल होईल.
आमची भाजीभाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. त्यांनी ही मागणी सोडून द्यावी अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली. हे सरकार निर्दयी असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमधील मंत्र्यांना काम करता येत नसल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकरी 50,000 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विम्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. शेतकऱ्यांनी माझ्यासमोर व्यथा मांडल्याचे त्यांनी सांगितले. जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा त्यांना मदत करणे गरजेचे असल्याचा टोला त्यांनी हाणला.
२०१४ च्या शपथपत्रातील गुन्ह्याप्रकरणात, देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाने दोषमुक्त घोषित केले आहे. सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देण्यात आला आहे.
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालात फडणवीस दोषमुक्त ठरले आहेत.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून नळदुर्ग येथे हजारो बांधव रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको करुन चक्काजाम आंदोलन करण्यात आले. एकाही मंत्र्याला तुळजापूर तालुक्यात फिरू न देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
इंडियाचं नाव भारत केल्यास १४ हजार कोटींचा खर्च होणार . इंडिया आघाडीमुळे भाजप नेते घाबरले आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आल्याने पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
भाजपचे जे आमदार,खासदार सोशल मीडियावर सक्रिय नाहीत त्यांना देवेंद्र फडणवीस, तसेच बावनकुळे यांच्याकडून कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर सक्रिय व्हा अशी सूचना त्यांना बैठकीत देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे सध्या अहमदनगर येथे दुष्काळी भागाची पाहाणी करीत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी अनेक समस्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत. काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे असा धीर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अकरा दिवसांपासून आरक्षणाला बसलेले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा समाजाच्या तरूणांनी आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाच्या प्रत्त्येक तरूणाने घ्यावा असेही ते म्हणाले.
आंदोलनाला मिळत असलेला पाठींबा पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता बळावली असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. या आंदोलनाला कुठेही गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य मराठा समाजाच्या तरूणांनी करू नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे. जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ आज मुंबईला रवाना होणार आहेत. या शिष्टमंडळात 13 तज्ञ आणि आठ गावकऱ्यांचा समावेश असणार आहे. सरकार जर अध्यादेशात बदल करून देणार असेल तर आम्हीही दोन पावलं मागे येण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे सद्या अहमदनगरच्या काकडी येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांनी बांधावर जावून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारचं आमच्याकडे लक्ष नसल्याचा आरोप केला. आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
अहमदनगरमधील काकडी गावामध्ये उद्धव ठाकरेंनी साधला संवाद. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर समस्या मांडत आम्हाला न्याय दिला नसून शासनाचंं फक्त ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर लक्ष आहे. या कार्यक्रमासाठी खर्च केला जातो पण आम्हाला मदत केली जात नसल्याचीही तक्रार करण्यात आली.
उद्धव ठाकरे आज शुक्रवारी अहमदनगर दौऱ्यावर आहेत. आता ते शिर्डी विमानतळावर दाखल झाले असून दुष्काळी भागांमध्ये ते दौरा करून पाहणी करणार आहेत.
जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडलं तर त्यात वावग नाही. आमचं नाव चिन्ह जाईल अस वाटतंय जयंत पाटील म्हणाले.
पंकजा मुंडे यांचा मी चाहता, महाराष्ट्रभर चाहता वर्ग आहे. त्याचा एक सोसियल मीडियावर व्हायरल झाला. त्यात मोदी यांच्या उज्वला योजनेचंं अपयश आहे. त्यांनी चुलीवर भाकरी केली, हे सरकारच अपयशच असल्याचं पंकजा पाटील यांनी म्हटलं आहे.
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरु आहे. ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपच्या काही आमदार, खासदारांची कामगिरी समाधानकारक नाही.. अशी माहिती समोर येत आहे. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपची बैठक सुरु आहे. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडून आमदार, खासदारांच्या कामाता आढावा घेण्यात आला. भाजपच्या सर्व खासदार, आमदारांचे रिपोर्टकार्ड तयार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य समोर येत आहे. मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही असं वक्तव्य पंकाजा मुंडे यांनी केलं आहे. ‘संविधानिकदृष्ट्या प्रमाणपत्र देणं शक्य होणार नाही, असं मला वाटत आहे. लेकरांनो हात जोडून विनंती करते आत्महत्या करू नका…’ असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार आज बारामतीमधील टंचाईग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. पाऊस कमी झाल्यामुळे बारामतीसह अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
सोलापूर याठिकाण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला आहे. विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत, याचवेळी त्यांच्यावर भंडारा उधळण्यात आला आहे. विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळत विरोध केला आहे. धनगर समाज आरक्षणावरुन आक्रमक झालं आहे. विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.
अहमदनगर दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज दुष्काळी भागात पाहाणी दौरा होणार आहे. सध्या सर्वत्र उद्धव ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्याची चर्चा रंगत आहे.
डॉक्टरांच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्यातरी जरांगे पाटील यांची प्रकृतीस स्थिर आहे. त्यांना सलाईन लावण्यात येत आहे. त्यांचा उपोषणाचा अकरावा दिवस आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती, मात्र गेला दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातल्या अनेक भागात सकाळपासूनच पाऊस सुरु झाला आहे.
पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या लोणावळ्यात पुन्हा पावसाने जोर धरलाय आहे. गेल्या 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस खूपच कमी कोसळल्याने चिंता कायम आहे.
नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी शहरात दिवसभरात १० मिमी पावसाची नोंद झाली. आता दोन दिवस नाशिकमध्ये पाऊस असणार आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचे कमबॅक झाले आहे. खेड, आंबेगाव, शिरूर, जुन्नर भागात जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या महिनाभर दडी मारलेला पाऊस परतल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या करिता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी 21 जणांचे शिष्ट मंडळ मुंबईला जाणार आहे ,परंतु मनोज जरांगे पाटील यांना अजूनही मुख्यमंत्र्यांकडून निरोप न आल्याने शिष्टमंडळ मुंबईला कधी जाणार हे मात्र अजूनही निश्चित नाहीय. या शिष्टमंडळात काही वकील, विचारवंत, समन्वयक असे तेरा आणि आठ गावकरी गावकऱ्यांचा समावेश असणार आहेत.
दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबरला G20 परिषद होत आहे. या परिषदेसाठी राजधानी दिल्ली सजली आहे. विविध देशांचे नेते दिल्लीत येण्यास सुरुवात झाली आहे. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष G20 साठी दिल्लीत दाखल झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी सात वाजता त्यांचं आगमन होईल.
#WATCH | Delhi: The national capital is all decked up to welcome the delegates for the G20 Summit that will be held here on September 9-10. pic.twitter.com/B2o9fuhsBY
— ANI (@ANI) September 8, 2023
दहीहंडी उत्सवाला गालबोट. दहीहंडी उत्सवात कार्यकर्ते आणि ढोल पथकांच्या वादकांमध्ये झाली हाणामारी. दहीहंडी उत्सव संपल्यानंतर आधी ढोल पथकाच्या वादकांनी कार्यकर्त्याला मारहाण केली. कार्यकर्त्याचा जमाव जमल्यानंतर त्यांनी ढोल ताशा पथकाच्या वादकाला बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकात घडला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिष्टमंडळ भेटीसाठी मुंबईत येणार आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हे शिष्टमंडळ सरकारची भेट घेणार आहे. शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळात 16 ते 17 सदस्य असतील. मागच्या 10 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु आहे.
G 20 परिषदेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. राजधानी दिल्लीत सलग तीन दिवस सुट्टी दिली आहे. सुट्ट्यांमुळे राजधानी दिल्लीतले रस्ते ओस पडले आहेत. चौकाचौकांमध्ये ध्वज लावून आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
मुंबईसह ठाण्यात आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच पावसामुळे चाकरमान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. महिनाभर दडी मारल्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
राजधानी नवी दिल्लीत G ट्वेंटी परिषद सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने राजधानी दिल्लीत 50 हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या परिषदेवर 40 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. दिल्लीत येणारे अनेक रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. दिल्लीच्या सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुरुष आणि स्त्रियांनी मराठा आरक्षणात उडी घेतलेली असतानाच आता लहान मुलांनीही या आरक्षण आंदोलनात उडी घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही, अशी शपथचजिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. पालकांसोबत शाळेत जाऊन दखलाही काढून घेण्यात येणार आहे. बदनापूर तालुक्यातील माळेगाव शाळेच्या विद्यार्तथ्यांनी ही शपथ घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस कालपासून परतला आहे. येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यात सध्या 36 जिल्ह्यांपैकी 21 जिल्ह्यात दुष्काळ स्थिती निर्माण झाल्याने बळीराजा आधीच चिंतेत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. गेल्या 11 दिवसापासून मराठा आंदोलकही जालन्यात त्यांच्या उपोषणस्थळी ठाण मांडून आहेत. दुसरीकडे जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे आजच्या पहिल्या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहावे लागणार आहे.