राज्यात अनेक भागात मान्सून पोहचला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेती कामांना वेग आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली. धारशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील एका शेतात वीज पडली. त्यानंतर त्या शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागले. भूगर्भतून निळे पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. त्याचे व्हिडिओ काढून लोक सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का वाहू लागले? या प्रश्नाचे शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी भूगर्भ शास्त्रांची मदत घेतली जाणार आहे. अगदी गडद निळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे. धारशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चार्य व्यक्त केले जात आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. परंतु धारशिवमधील प्रकारची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
मराठवाड्यात दमदार पाऊस सुरु झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. पहिल्याच पावसाने धरणात पाणी साठू लागले आहे. या पावसामुळे संभाजीनगरला महिनाभर पाणी पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जायकवाडी धरणात तब्बल 1 टक्क्याने पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी धरणात 4600 क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडी धरण भरायला सुरुवात झाल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे.
धारशिवमधील शेतात निळे पाणी येत आहे. हे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे…. pic.twitter.com/tggdh9D16e
— jitendra (@jitendrazavar) June 11, 2024
संभाजीनगरात मान्सूनचे आगमन दमदार झाले आहे. ६ तासांत ५७.८ मिमी पाऊस झाला आहे. संभाजीनगरमध्ये ५७.८ मिमी. पावसाची नोंद झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेने दिली. तसेच नांदेड, बीड,जालना, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.