नववर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणाईसाठी पोलिसांनी चांगली बातमी दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यात पहाटे पाचपर्यंत दारुची दुकाने उघडी ठेवता येणार आहे. परंतु दारु पिऊन सर्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर गोंधळ कोणालाही करता येणार नाही. त्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे. तसेच ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात मोहीम राबवणार आहे. त्यामुळे दारु पिवून गाडी चालवणाऱ्यांची खैर असणार नाही. त्यांचे नववर्ष कारागृहात जाणार आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीचे नियोजन माध्यमांना सांगितले. ते म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे शहरात २३ ठिकाणी ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात मोहीम राबवण्यात येणार आहे. पुण्यात पहाटे ५ पर्यंत दारू दुकानांना परवानगी दिली आहे. परंतु ड्रग्स आणि अल्पवयीन लोकांना दारू न देण्याचे आदेश दिले आहे. या सगळ्या नियमांचे पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार आहे.
३१ डिसेंबर रोजी ३००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच ७०० वाहतूक पोलीस तैनात असतील. सीसीटीव्ही कॅमेराचा लाइव्ह मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होते. त्याठिकाणी नजर ठेवण्यात येणार आहे. ४० ठिकाणी अधिकृत पार्ट्या आणि कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोरेगाव भीमा नियोजन सांगितले. पाच हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. एक हजार होमगार्ड आणि आठ कंपनी काम करणार आहे. ७५० पोलीस अधिकारी तैनात असणार आहे. ४५ ठिकाणी पार्किंग सेंटर आहेत. त्यात ३० हजार कार आणि ३० हजार दुचाकी पार्किंग करता येणार आहे. ६५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ३०० सीसीटीव्ही, १० ड्रोन, ५० पोलीस टॉवर, चोरी घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात केले आहे. या ठिकाणी ३१ डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर केला आहे.
मागील वर्षी सात ते आठ लाख लोक आले होते. आता गर्दी वाढेल असे नियोजन करण्यात आले आहे. दहा लाख लोक येतील, अशी अपेक्षा आहे. व्हीआयपी काही नेते येणार आहे. सोशल मीडिया वापरावर निर्बंध असणार आहे. आक्षेपार्ह आढल्यास कारवाई करण्यात येईल.