लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. महाराष्ट्रातील ११ लोकसभा जागांवर ७ मे रोजी मतदान होणार आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचारसभांचा धडाका लावत होते. त्याचवेळी त्यांच्या पक्षातील बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत होता. अखेरी रविवारी मध्यरात्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाला. नाशिक मधील ठाकरे गटाचे निष्ठावंत विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. विजय करंजकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री तीनच्या सुमारास मुंबईतील बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसे देखील उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताना विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला. ते म्हणाले, मी माझ्या पदांचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमधून मी लोकसभेला इच्छुक होतो. परंतु मला आश्वासन दिल्यानंतरही टाळले गेले. ज्याचे नाव चर्चेत नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आली. आता गद्दार कोण आहे, हे येत्या काळात मी दाखवून देईल.
विजय करंजकर यांनी उबाठामधील कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, ठाकरे गटाच्या शिवसेनेत तत्व आणि सत्व दिसत नाही. ज्यांनी माझा घात केला आहे. त्यांना येणाऱ्या काळात कळेल. ही लोक शिंदे साहेबांना गद्दार बोलत आहे. परंतु खाऱ्या अर्थाने गद्दार पडद्याआड लपले आहेत. त्यांचा पडदा मी उठवणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय करंजकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, जे आमच्यावर आरोप करतात त्यांनी स्वतःच्या गिरीवानमध्ये झाकून पाहिले पाहिजे. आमच्याकडे येवढे लोक येत आहे, ते चुकीचे आहेत आणि एक माणूस बरोबर आहे का? परंतु त्यांच्यावर न बोलेल बरं. कारण ते सुप्रीम कोर्टाला देखील आदेश देतात. त्यांना मी भला आणि माझे कुटंब भले, असेच धोरण आहे.
विजय करंजकर यांची संघटनेमध्ये नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख व उपनेते म्हणून जबाबदारी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आपल्या संघटनेत कोणीही मालक नाही. कोणी नोकर नाही सर्वच सारखे आहेत. जो काम करेल तो पुढे जाईल. विजय यांनी खऱ्या शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. त्यामुळे आता नाशिकमधील लोकसभेची जागेला विजयचा मार्ग मोकळा झाला आहे.