माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार…अमोल कोल्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

| Updated on: Apr 28, 2024 | 2:32 PM

ज्या व्यक्तीकडे 22 जागांवर उमेदवार निश्चीत करण्याचा अधिकार होतो, ते आता 4 जागांवर कसे काय समाधान मानत आहे, असा चिमटा अजित पवार यांना अमोल कोल्हे यांनी घेतला. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला 4 जागांवर समाधान मानाव लागत असेल तर विचार करावा लागतो.

माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
खासदार अमोल कोल्हे
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र असलेले दोन नेते पक्षातील फुटीनंतर एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. अजित पवार विरुद्ध खासदार अमोल कोल्हे यांच्यात कलगीतुरा चांगलाच रंगत आहे. अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असाही सामना होत आहे. अजित पवार पाणी प्रश्नांवरून आणि बारामातीच्या विकासावरुन सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी आपण केलेल्या कामांचे श्रेय सुप्रिया सुळे घेत आहेत, असा आरोप केला आहे. त्याला उत्तर खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहे. व्यक्तीगत कामे कोणी केली असतील तर तो व्यक्ती खूप मोठा आहे. स्वतःच्या खिशातून अशी कामे केली नाही. जनतेच्या टॅक्समधून कामे होत असतात. परंतु त्याचे श्रेय स्वतःकडे कोणी घेत असेल तर काय करणार? असा निशाणा अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर साधला. तसेच मी बाहेरच्या मतदारसंघात सुध्दा सभा घेणार आहे. कारण माझा बालेकिल्ला मजबूत आहे. माझा मुलुख सुध्दा मजबूत आहे, असे त्यांनी म्हटले.

राज्यात महाविकास आघाडीचे ३५ खासदार येणार

अमोल कोल्हे म्हणाले की, आज लोकांमध्ये जाताना आम्हाला अभिमान आहे. कारण आम्ही विचारांशी प्रतरणा केली नाही. गेली १० वर्षे जनतेची घोर निराशेमध्ये गेली आहेत. यामुळे आता राज्यात महाविकास आघाडीचे ३० ते ३५ खासदार निवडून येतील. सर्वसामान्य जनता विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे.

केंद्र सरकार महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकावर अन्याय करत आहे. गुजरातचा कांदा निर्यात होणार पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात होणार नाही? असे का होत आहे. महाराष्ट्राच्या कांद्याचे निर्यात का सुरू करत नाही, वेदांता फॉक्सकॉन का परत आली नाही, त्याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

फक्त चार जागा…

शिरुरमध्ये धमकी कुणी देत नाही. जर धमकी दिली तर मतदानातून जनता त्याला उत्तर देतील. ज्या व्यक्तीकडे 22 जागांवर उमेदवार निश्चीत करण्याचा अधिकार होतो, ते आता 4 जागांवर कसे काय समाधान मानत आहे, असा चिमटा अजित पवार यांना अमोल कोल्हे यांनी घेतला. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला 4 जागांवर समाधान मानाव लागत असेल तर विचार करावा लागतो. त्यातही या 4 जागांमध्ये दोन घरचे आणि दोन उमेदवार आयात करण्यात आले आहे. असो, मी त्यांना शुभेच्छा देईल, असे त्यांनी अजित पवार यांना म्हटले आहे.