jalgaon lok sabha smita wagh: अभाविपतून-संसदेपर्यंत… स्मिता वाघ यांचा राजकीय आलेख वाघाच्या झेपेसारखा

| Updated on: Jun 05, 2024 | 3:56 PM

jalgaon lok sabha mp smita wagh profile: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेट २००५ मध्ये सदस्या झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. त्यानंतर प्रथम २००९ मध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्या पोहचल्या. २०१५मध्ये भाजपच्या महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष त्यांना करण्यात आले.

jalgaon lok sabha smita wagh: अभाविपतून-संसदेपर्यंत... स्मिता वाघ यांचा राजकीय आलेख वाघाच्या झेपेसारखा
स्मिता वाघ
Follow us on

jalgaon lok sabha mp smita wagh profile: लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपची पिछेहाट होत असताना जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपच्या महिला उमेदवाराने मोठा विजय मिळवला. राज्यातील वातावरण भाजपच्या विरोधात असताना त्याची झळ जळगाव लोकसभा मतदार संघापर्यंत त्यांनी पोहचू दिली नाही. भाजपमधून निवडून आलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी बंडखोरी करत करण पवार यांना निवडणूक रिंगणात उद्धव सेनेकडून उतरवले होते. या सर्व विपरीत परिस्थिती स्मिता वाघ यांचे यश उल्लेखनीय ठरले आहे. २०१९ मधील निवडणूक पक्षाने दिलेले तिकीट ऐनवेळीस रद्द करत उन्मेष पाटील यांना दिले होते. त्यानंतर नाराज न होता संघाच्या या स्वयंसेवकाने पक्षाचे काम अधिक जोमाने केले. त्याची दखल घेत २०१४ मध्ये लोकसभेचे तिकीट मिळवले अन् आपल्या कामाच्या जोरावर विजय मिळवला. स्मिता वाघ यांना ६ लाख ७४ हजार २६ मते मिळाली तर करण पवार यांना ४ लाख २२ हजार ६३० मते मिळाली. त्यांचे मूळ गाव अंदरसुल (ता. येवला जि. नाशिक) आहे. परंतु त्या अमळनेरमध्येच राहतात.

विद्यार्थीदशेपासून संघाच्या सानिध्यात

स्मिती वाघ महाविद्यालयीन जीवनापासून संघाच्या सानिध्यात आल्या. संघामुळे त्यांच्या ‘राष्ट्रवाद’ व ‘राष्ट्र प्रथम’ या विचारांची मुळे रुजली. महाविद्यालयात असताना त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करु लागल्या. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांना संघटनेच्या माध्यमातून सोडवले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावाला होण्यासाठी गाजलेल्या आंदोलनात त्या सक्रीय होत्या.

परिवारातून राजकीय वारसा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित संघटनेत काम आणि परिवारातील राजकीय वारसा त्यामुळे त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. त्यांचे वडीलही पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यातील नेतृत्वगुण समोर येऊ लागले. यामुळे २००३मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य बनल्या. जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्षच्या माध्यमातून ग्रामीण राजकारण जवळून पाहत ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडवले.

हे सुद्धा वाचा

स्मिता वाघ यांचा राजकीय प्रवास

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेट २००५ मध्ये सदस्या झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. त्यानंतर प्रथम २००९ मध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्या पोहचल्या. २०१५मध्ये भाजपच्या महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष त्यांना करण्यात आले. २०१७ पासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, त्यानंतर २०१७मध्ये त्या विधान परिषद आमदार आणि आता खासदार त्या झाल्या.