लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान होणार आहे. आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. परंतु पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित झाल्या आहेत. पाच जागांवर काँग्रेस आणि भाजप-शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले आहेत. या यादीत १११ उमेदवारांची नावे आहेत. त्यात महाराष्ट्रातील नावे होती. यामुळे आता महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. नितीन गडकरी यांनी आपली रणनीती जाहीर केली आहे. त्यात जेवणासाठी जाऊ परंतु पिण्यासाठी जाणार नाही, टॅक्सी, बस देणार नाही. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना किती गर्दी होईल, हे दिसेल, असे त्यांनी म्हटले होते. राज्यातील नाही तर देशातील ही चर्चेतील लढत असणार आहे. या लढतीत गडकरी यांचे पारडे जड असणार आहे.
काँग्रेसने चंद्रपूरमधून स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. त्यांच्याविरुद्ध भाजप नेते सुधीर मुनगंटीवार मैदानात आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार हिने तयारी सुरु केली होती. परंतु अखेर काँग्रेसने शिवानीची उमेदवारी नाकारत प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. यामुळे विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.