छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. मागच्या आवठड्यात मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. चेतन पाटीलकडे पुतळ्याच चबुतरा बांधण्याची जबाबदारी होती. त्याला अटक करण्यात आली आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलं होतं.
हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित होता. पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाच वातावरण होतं. शिवप्रेमी आणि विरोधी पक्षांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं होतं. जयदीप आपटे कल्याणला राहतो. आठ दिवस झाले, तरी अजून पोलीस त्याला शोधू शकलेले नाहीत. त्याचा थांगपत्ता लागत नाहीय. पोलीस त्याच्या कल्याणच्या घराबाहेर तळ ठोकून आहेत.
‘आपटेला पकडणं मुश्किल ही नाही नामुंमकीन हैं’
अखेर सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याच्या विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. जयदीप आपटे याला दीड ते अडीच फुटी पुतळे बनवण्याचा अनुभव होता, असं म्हटलं जातं. जितेंद्र आव्हाड यांनी जयदीप आपटे सापडत नसल्याने त्यावरुन सरकारला टोमणा मारला आहे. त्यांनी डॉन चित्रपटातील डायलॉग मारुन दाखवला. ‘आपटेला पकडणं मुश्किल ही नाही नामुंमकीन हैं’ “कुठलाही अनुभव नसलेल्या जयदीपला कोणी हे काम दिलं ते लोक देखील तेवढीच दोषी आहेत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.