Cyclone Fengal: राज्यभरातील अनेक शहरांच्या किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे. राज्यात पुण्याच्या तपमानाने या वर्षाचा निचांक नोंदवला. पुण्याचे तापमान ९.९ अंशावर आले. मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदवले गेले आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. रात्री तापमान घसरलेले असताना दिवसाही हुडहुडी जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस पुण्यातील तापमानात घट होत राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. पुण्याच्या भोरमध्ये तापमानात घट झाल्याने शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या गेल्या आहेत. बोचऱ्या थंडीत धुक्याच्या वातावरणात उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवत आहे. तापमानात चांगलीच घट झाल्याने नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे.
27 Nov, Possibility of coldwave conditions in North Madhya Maharashtra on 28 & 29 Nov.
Watch for low temperatures and do take care. Pune Nashik Ahmednagar
Warm clothing please. @RMC_Mumbai pic.twitter.com/mRLkigh3DW— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 27, 2024
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. आता आलेले फेंगल हे चक्रीवादळ २०२४ मधील तिसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी आलेल्या दाना चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले होते. फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूतून श्रीलंकेकडे जाणार आहे.
With IMD expecting the Deep Depression to become Cyclonic Storm #Fengal later today a detailed #WxwithCOMK post on why widespread #Rains likely to continue over Coastal #TamilNadu until Friday / Saturday. Delta should maintain vigil today for very heavy Rains #NEM2024.… pic.twitter.com/15nWDguWtW
— Chennai Rains (COMK) (@ChennaiRains) November 27, 2024
पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, राज्यात पुढील दोन तीन दिवस थंडीचा जोर कायम असणार आहे. यंदा थंडीचे वातावरण लवकर तयार झाले आहे. यामुळे पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
बुधवारी पुण्यातील काही भागात तापमान जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर भारतातल्या बऱ्याच शहरापेक्षा कमी होते. पुणे शहरातील एनडीए असलेल्या भागात काल ८.९ डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदवण्यात आले. हे तापमान पंजाबच्या अमृतसर, हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा आणि दिल्लीच्या सफदरजंग पेक्षा कमी होते. या वर्षातल्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमान पुण्यात नोंदवले गेले आहे. नाशिकमधील निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ओझर एचएएल येथे 6.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले आहे.