Maharashtra APMC Election Result Live Update : महाराष्ट्रातील बाजार समित्यांचा निकाल LIVE

| Updated on: May 03, 2023 | 6:57 AM

महाराष्ट्रातील बाजार समित्यांची रणधुमाळी सुरु असतानाच आता निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Maharashtra APMC Election Result Live Update : महाराष्ट्रातील बाजार समित्यांचा निकाल LIVE
Follow us on

मुंबई : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी ( APMC Election ) आज निवडणूक पार पडली. मतदान झाल्यानंतर निवडणूक पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी आणल्या असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात बाजार समित्यांमध्ये सत्ता महत्त्वाची मानली जाते. आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Maharashtra APMC Election Result Live Update : महाराष्ट्रातील बाजार समित्यांचा निकाल पाहण्यासाठी फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 May 2023 08:44 PM (IST)

    सीबीआयचे 19 ठिकाणी छापे, 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त

    सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. 19 ठिकाणी छापे टाकून 20 कोटींहून अधिक रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपी राजेंद्र कुमार गुप्ता हे पाणी आणि उर्जा कन्सल्टन्सीचे माजी सीएमडी होते. ही कंपनी जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत होती. सीबीआयने राजेंद्र गुप्ता यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबाद येथील 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

  • 01 May 2023 05:48 PM (IST)

    Satara APMC Election 2023 Result 
    सातारा जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल
    *सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती*
    आमदार शिवेंद्रराजे भोसले गट 18/0 ने विजयी
    स्वाभिमानी शेतकरी संघटना (उदयनराजे गट पराभूत)
    ————————————-
    *कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती*
    राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे 16/2 ने विजयी
    शिवसेनेचे आ. महेश शिंदे 1 जागेवर समाधान
     अपक्ष 1
    —————————————
    *फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती*
    राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर 14 जागांवर विजयी
    राष्ट्रवादीच्या 4 जागा बिनविरोध
    रासप आणि शिवसेनेचा गटाचा मोठा पराभव
    ———+-++++++++++++++++———–
    *वाई कृषी उत्पन्न बाजार समिती*
    राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील 17/1 ने विजयी
    भाजप नेते मदन भोसले 1 जागेवर समाधान
    ——————————-
    *वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती*
    खटाव तालुका विकास आघाडीला 13/5. ने विजयी
    राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 5 जागांवर समाधानी
    ——————————————-
    *लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती*
    राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील 17/1 ने विजयी
    भाजपच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलला 1 जागेवर मानावे लागले समाधान
    —————————————–
    *कराड कृषी उत्पन्न बाजार समिती*
    काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या रयत पॅनलचा गट 12/6
    मंत्री बाळासाहेब पाटील डॉक्टर अतुल भोसले यांना शेतकरी विकास पॅनलचे 6 जागांवर समाधान
    —————————————–
    *पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती*
    शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई  15/3 ने विजयी
    राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला 3 जागांवर समाधान

  • 01 May 2023 05:33 PM (IST)

    साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का. पुढच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे यांनी दिलं हे थेट आव्हान
    पाहा काय म्हणाले शिवेंद्रराजे भोसले : https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-apmc-election-udayanraje-bhosale-loss-satara-apmc-committee-from-shivendraraje-bhosale-925028.html
  • 01 May 2023 02:39 PM (IST)

    Phaltan APMC Election Result

    सातारा – फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती

    राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकर गटाचे निर्विवाद वर्चस्व

    18 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या

    14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत रामराजेराजे गटानं सर्व 14 जागा जिंकल्या

    रासप आणि शिवसेनेचा मोठा पराभव

  • 01 May 2023 02:37 PM (IST)

    Paithan APMC Election Result

    पैठण बाजार समितीवर संदीपान भुमरे यांचे वर्चस्व

    पैठण बाजार समितीवर शिंदे गट शिवसेनेने फडकवला झेंडा

    18 पैकी 15 जागांवर शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार विजयी

    पैठण बाजार समितीत शिंदे गट शिवसेनेचा दणदणीत विजय

  • 01 May 2023 02:37 PM (IST)

    Patan APMC Election Result

    पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत ऐतिहासिक सत्तांतर

    चाळीस वर्षानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी जिंकली पाटण बाजार समिती

    राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाकडून बाजार समितीची खेचून आणली सत्ता

  • 01 May 2023 01:51 PM (IST)

    पाटण | पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत ऐतिहासिक सत्तांतर

    चाळीस वर्षानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी जिंकली पाटण बाजार समिती

    राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाकडून बाजार समितीची खेचून आणली सत्ता

  • 01 May 2023 01:31 PM (IST)

    सातारा | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं वर्चस्व

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धूळ चारत 18 जागांवर शिवेंद्रराजे गटाने विजय मिळवला…

    आमदार शिवेंद्रराजेंचे 18/0 ने पारडे साताऱ्यात जड ठरलं…

  • 01 May 2023 11:27 AM (IST)

    Ahamadnagar – Jamkhed APMC election Result

    जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा पेज निर्माण झालाय

    दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्यानेसभापती आणि उपसभापती निवडीत चुरस

    भाजपचे माजी सभापती भगवान मुरूमकर यांनी केले खासदार सुजय विखे यांच्यावर गंभीर आरोप

    खासदार सुजय विखे, आमदार रोहित पवार आणि अमोल राळेभात यांचं पॅनल होता, तर आमदार राम शिंदे एकटी लढत होते.

    आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वात 9 तर विरोधी पॅनलमध्ये भाजपाचे खासदार सुजय विखें समर्थकांच्या 2 जागा आल्या

    सभापती आणि उपसभापती भाजपचाच होईल, मात्र जबाबदारी ही सुजय विखेंची असणार

    कर्जत – जामखेड बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीसाठी आता विखेची भूमिका महत्त्वाची ठरणार

  • 01 May 2023 11:19 AM (IST)

    चंद्रपूर : बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

    काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका

    खासदाराने जर आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा मी ब्रम्हपुरी पाहून टाकतो.

    धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना दिले आव्हान, सोबतच त्यांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळे विरोधी पक्षनेते आणि मंत्री झाल्याचा केला दावा

    वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोणत्याच कार्यकर्त्यांचं काम केलं नाही, आमदाराला निधी दिला नाही, कार्यकर्ते मजबूत केले नाही असा केला आरोप.

  • 01 May 2023 11:15 AM (IST)

    पालम बाजार समिती निवडणुकीत रासप आणि शिवसेनेची बाजी

    Maharashtra APMC Election Result – Palam APMC 

    पालम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत रासप आणि शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे.

    परभणीच्या पालम कृषी उत्पन्न बाजार समिती  निवडणुकीत आमदार रत्नाकर गुट्टे यांची सरशी.
    पालम बाजार समितीत रासप आणि शिवसेना आघाडीचा 14 जागा जिंकत महावीकासआघाडीचा पराभव
    अटीतटीच्या या निवडणुकीत अखेर रासपच्या आघाडीने सत्ता मिळवली.
    महविकास आघाडीला मात्र केवळ 4 जागा जिंकता आल्या.
  • 01 May 2023 11:12 AM (IST)

    Satara APMC Election Result

    सातारा :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिल्ह्यातील आठ ठिकाणी मतमोजणीला झाली सुरुवात

    सातारा, कोरेगाव, वाई फलटण, लोणंद, वडूज, कराड,पाटण या बाजार समितीचे आज लागणार निकाल

    सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती मतमोजणीत आमदार शिवेंद्रराजे गट आघाडीवर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गट पिछाडीवर (उदयनराजे गट पिछाडीवर)

  • 01 May 2023 11:09 AM (IST)

    Manmad APMC Election Result 2023

    मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू.

    राज्यातील हाय होल्टज ड्रामा आणि अती संवेदनशील ठरलेल्या नाशिकच्या मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल काही वेळातच जाहीर होणार.

    सुहास कांदे आणि भुजबळसह पाच माजी आमदारांची यांची प्रतिष्ठा पणाला.

    सर्व मतदारांना अज्ञात स्थळी घेऊन गेल्याची राज्यातील पहिली बाजार समिती आहे .

    पहिल्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरल्यामुळे या निकालावर लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

    विद्यमान आमदार सुहास कांदे विरुद्ध माविआच्या पाच माजी आमदार अशी चुरशीची लढत आहे.

    नांदगाव बाजार समितीच्या 18 पैकी 16 जागांवर विजय मिळवल्यानंतर सुहास कांदे यांनी भुजबळ कुटुंबीयांचे चक्क बाप काढून निवडणुकीचे खुले आव्हान दिल्यानंतर ह्या निकाला कडे लक्ष वेधले गेले आहे.

  • 30 Apr 2023 10:16 PM (IST)

    Yavatmal APMC Election Result

    यवतमाळ – घाटंजी बाजार समितीत भाजपचे वर्चस्व

    10 जागेवर भाजपाचा विजय, तर 8 जागेवर महाविकासआघाडी

    भाजपचे आमदार संदीप धुर्वे यांचा बाजार समितीवर झेंडा

  • 30 Apr 2023 10:14 PM (IST)

    • अकोले बाजार समितीत महाविकास आघाडीची बाजी
    • मात्र फेर मोजणीत भाजपच्या 2 जागा वाढल्या.
    • मविआच्या दोन जागा झाल्या कमी.
    • 11 जागा जिंकत महाविकास आघाडी विजयी.
    • पिचड – पिता पुत्रांना धक्का.
    • पिचड समर्थकांना अवघ्या 7 जागा.
    • 18 पैकी 3 जागा झाल्या होत्या बिनविरोध.

    राष्ट्रवादी – 11
    भाजप – 07
    कॉग्रेस – 00
    ठाकरे गट – 00
    शिवसेना – 00

  • 30 Apr 2023 09:36 PM (IST)

    Ahamadnagar APMC Election Result

    अहमदनगर – जामखेड बाजार समिती निवडणुकीचा 13 जागेचा निकाल हाती

    भाजप आमदार राम शिंदे गटाला 6 तर रोहित पवारांच्या गटाला 7 जागा

    जामखेड बाजार समिती निवडणुकीत 5 जागेसाठी चुरशीची लढत

  • 30 Apr 2023 09:34 PM (IST)

    Kopargaon APMC Election Result 2023

    अहमदनगर – कोपरगाव बाजार समितीत स्थानिक आघाडीला यश.
    पारंपारिक प्रतिस्पर्धी काळे – कोल्हे यांचा एकत्रित पँनल.
    काळे – कोल्हे – परजणे – औताडे यांनी केली होती स्थानिक आघाडी.
    ठाकरे गट आणि काँग्रेसचा दारूण पराभव.
    स्थानिक आघाडीला 17 जागा. तर एका जागेवर अपक्षाची बाजी.
    हमाल – मापाडी गटातून अपक्षाचा विजय.

    स्थानिक आघाडी – 17
    अपक्ष – 01
    ठाकरे गट – 00
    कॉग्रेस – 00

  • 30 Apr 2023 09:33 PM (IST)

    Yavatmal APMC Election Result

    यवतमाळ – झरीजामनी कृषी उत्पन्न बाजार समितीत मविआ चा विजय

    सर्व 18 जागेवर मविआ उमेदवारांचा दणदणीत विजय

    खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार विश्वास नांदेकर व वामानराव कासावर यांच्या नेतृत्वात विजय

    माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना धक्का.

  • 30 Apr 2023 09:30 PM (IST)

    Yavatmal Bori Arab APMC Election result

    यवतमाळ- बोरी अरब बाजार समिती वर संजय राठोड यांचे वर्चस्व

    बोरी बाजार समिती वर शिंदे गट – राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

    18 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचा विजय

    काँग्रेसच्या पॅनलला फक्त 5 जागी यश

  • 30 Apr 2023 09:05 PM (IST)

    Shrirampur APMC Election 2023 Result

    अहमदनगर : श्रीरामपूर बाजार समितीत महाविकास आघाडीचा धुव्वा…
    काॅग्रेस – राष्ट्रवादीला एकही जागा नाही.
    17 जागा जिंकत विखे,मुरकुटे आणि ससाणे गटाची सरशी.
    1 अपक्ष उमेदवार आला निवडून.
    भाजपचे विखे , काँग्रेसचे ससाणे आणि मुरकटे यांच्या स्थानिक आघाडीचा विजय.
    विखे पाटलांच्या नेतृत्वात श्रीरामपूर बाजार समितीवर सत्ता…

    स्थानिक आघाडी – 17
    इतर – 01

  • 30 Apr 2023 09:03 PM (IST)

    Sangola APMC Election Result

    सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडीची सत्ता

    सांगोल्यात शिवसेना, शेकाप, भाजप आणि राष्ट्रवादीची झाली होती सर्वपक्षीय युती

    आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात बाजार समितीसाठी सर्व पक्ष एकदम ओके

    सर्वपक्षीय युतीला बंडखोर शेकाप,काँग्रेस व ठाकरे गटाच्या उमेदवारांनी दिले होते आव्हान

    सोळा जागांवर सर्व पक्ष शेतकरी महाविकास आघाडीचा विजय : यापूर्वी दोन जागा झाल्या होत्या बिनविरोध

    बाजार समितीच्या निकालानंतर उमेदवारांचा विजय जल्लोष

    आमदार शहाजीबापू पाटलांच्या मतदार संघात बाजार समितीसाठी झाली होती सर्व पक्षीयांची आघाडी

    सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज रविवारी मतदान झाल्यानंतर तात्काळ मतमोजणी प्रक्रिया देखील झाली पूर्ण

  • 30 Apr 2023 08:55 PM (IST)

    Amravati Chandur APMC Election Result

    अमरावती : चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांचा दणदणीत विजय

    चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर बच्चू कडू यांची एकहाती सत्ता

    चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेना आणि भाजपचा धुव्वा

    बच्चू कडू यांच्या पॅनलचे सर्व 18 उमेदवार विजयी

    काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेना आणि भाजपचा दारुण पराभव

  • 30 Apr 2023 08:53 PM (IST)

    वाशिम : कारंजा बाजार समिती मतमोजणी निकाल

    एकूण : 18 जागा

    03 जागांचे निकाल जाहीर

    भाजपा / शिंदे गट – 00

    महाविकास आघाडी (राष्ट्रवादी)-03

    इतर – 00

  • 30 Apr 2023 08:50 PM (IST)

    वाशिम : मालेगाव बाजार समिती मतमोजणी निकाल.

    एकूण : 18 जागा

    08 जागांचे निकाल जाहीर…

    भाजपा /शिंदे गट – 01

    महाविकासआघाडी -07

    इतर – 00

  • 30 Apr 2023 08:47 PM (IST)

    Kalampuri APMC Election Result

    हिंगोली आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का, मार्केट कमिटीत बांगर यांचा किल्ला ढासळला

    बांगर यांच्या बालेकिल्ल्यातील मार्केट कमिटी महाविकासआघाडीच्या ताब्यात

    कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकासआघाडीच्या ताब्यात

    17 पैकी 12 जागा महाविकासआघाडी च्या ताब्यात

  • 30 Apr 2023 08:42 PM (IST)

    Akole APMC Election Result

    • अकोले बाजार समितीत मधुकरराव पिचड यांचा दारूण पराभव.
    • अहमदनगर जिल्ह्यातील अकोले बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता.
    • 18 पैकी 13 जागांवर आघाडीचा विजय.
    • भाजपच्या मधुकर पिचडांना आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या गटाला अवघ्या पाच जागा.
    • विधानसभा, साखर कारखान्यानंतर बाजार समितीतही पिचडांचा पराभव.
    • महाविकास आघाडीने दिला पिचडांना धक्का, बाजार समितीवर मिळवली बहुमताने सत्ता.
  • 30 Apr 2023 08:28 PM (IST)

    Amlner Apmc Update | अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अपडेट

    पुरुष आणि महिला राखीव सोसायटी मतदारसंघ,जागा 7 + 2, ग्रामपंचायत मतदारसंघ अपडेट

    3 वाजून 40 मिनिट अपडेट

    1) स्मिताताई वाघ- 726
    2) अशोक आधार-721
    3) सुभाष जीभाऊ-656
    4) सुरेश दादा- 507
    5) अशोक डॉक्टर-421
    6) नितीन बापूराव-409
    7) भोजमल दादा-394

    सोसायटी मतदारसंघात विजयी…
    —————————–
    विजयी

    1) सुषमा देसले – 634
    2) पुष्पा पाटील – 593

    सेवा सहकारी वि जा भ ज मतदारसंघ

    1) समाधान धनगर – 603
    ———————

    इतर मागासवर्गीय मतदारसंघ

    1) डॉ अनिल शिंदे – 722, विजयी.

    ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ

    1) प्रफुल्ल पाटील – 506
    2) सचिन पाटील – 510

    ग्राप आर्थिक दुर्बल मतदारसंघ

    1)हिरालाल पाटील – 481, विजयी.

    ग्राप अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

    1) भाईदास भिल – 433, विजयी

    हमाल मापाडी मतदार संघ

    1) शरद पाटील – 195, विजयी……

     

  • 30 Apr 2023 07:18 PM (IST)

    Ulhasnagar APMC Election Result

    • उल्हासनगर एपीएमसीवर भाजपचा झेंडा
    • १८ पैकी १५ जागा जिंकत भाजपचं बहुमत
    • तर शिवसेनेला तीन जागा
    • काँग्रेस राष्ट्रवादीसह अपक्षांचा उडाला धुव्वा
  • 30 Apr 2023 07:15 PM (IST)

    Yavatmal APMC Election Result

    यवतमाळ – दारव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

    मंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात शिवसेना 18 पैकी 16 जागी विजयी

    माजी मंत्री माणिकराव ठाकरे व व माजी आमदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा दारव्हा येथे दारुण पराभव

  • 30 Apr 2023 07:13 PM (IST)

    Ahamadnagar Nevasa APMC election Result 

    • अहमदनगर – नेवासा बाजार समिती निवडणुकीत ठाकरे गटाची सरशी.
    • माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वातील पँनलचे 7 उमेदवार विजयी.
    • भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे यांच्या पँनलला सुरूवातीच्या मतमोजणीत एकही जागा नाही.
  • 30 Apr 2023 07:12 PM (IST)

    तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

    18 जागा पैकी

    राष्ट्रवादी – 8 विजयी

    भाजप – 3 विजयी

  • 30 Apr 2023 07:11 PM (IST)

    Washim Malegaon APMC Election result 

    वाशिम : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक

    सात जागांवर महाविकासआघाडीच्या (कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी) उमेदवारांचा विजय

  • 30 Apr 2023 07:05 PM (IST)

    Maharashtra APMC Election Result 2023

    भंडारा – पवनी बाजार समिती निकाल

    निवडणूक निकाल जाहीर – 18 जागे पैकी 18 जागेचा निकाल जाहीर

    भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस + शिंदे गट – 07

    काँग्रेस – 11

  • 30 Apr 2023 07:01 PM (IST)

    Washim APMC Election 

    वाशिम : रिसोड बाजार समिती मतमोजणी निकाल

    एकूण : 18 जागा

    03 जागांचे निकाल जाहीर…

    भाजपा – 03…

    राष्ट्रवादी – 00..

    काँग्रेस – 00…

    शिंदेगट -00..

    वंचित -00…

    शिवसेना ठाकरे गट -00

    इतर – 00

  • 30 Apr 2023 06:59 PM (IST)

    Fulambri APMC Election Result

    फुलंब्री बाजार समितीत भाजप शिवसेना युतीचा दणदणीत विजय

    18 पैकी 15 जागांवर भाजप-शिवसेनेचा विजय

    काँग्रेसच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

    हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेचा मोठा विजय

    भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू

  • 30 Apr 2023 06:56 PM (IST)

    Tasgaon APMC election Result

    सांगली – तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

    18 जागा पैकी

    राष्ट्रवादी – 3 विजयी

    भाजप – 2 विजयी

    भाजपा खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादी आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांची प्रतिष्ठा लागली आहे पणाला.

  • 30 Apr 2023 06:52 PM (IST)

    Amravati – Dhamangaon Bazar samiti election result

    • धामणगाव रेल्वे बाजार समितीत भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना धक्का
    • अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची एकहाती सत्ता
    • 18 पैकी 16 जागेवर काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा त्यांच्या गटाचे उमेदवार विजयी
    • भाजपला 1 जागा तर 1 जागी अपक्ष उमेदवार विजयी
    • राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची होती या ठिकाणी युती
  • 30 Apr 2023 06:39 PM (IST)

    Parbhani – Sonpeth APMC election Result 2023

    परभणी – सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी दणदणीत विजय

    राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांनी गड राखला

    18 पैकी 18 जागांवर राष्ट्रवादीने मारली बाजी

  • 30 Apr 2023 06:12 PM (IST)

    Rahata APMC election Result 2023

    • महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गड राखला.
    • राहाता बाजार समिती निवडणूकीत विखे पाटलांच निर्विवाद वर्चस्व…
    • 18 च्या 18 जागेवर भाजपचा दणदणीत विजय.
    • थोरात गटाचा दारुण पराभव.
    • राहाता बाजार समितीत भाजपचा झेंडा.
    • भाजप कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष.
    • फटाक्याची आतषबाजी , गुलालाची उधळण करत जल्लोष….
    • भाजप – 18 जागा, मविआ – 00 जागा
  • 30 Apr 2023 05:47 PM (IST)

    Aashti APMC Election Result

    जालना जिल्ह्यातील पहिला निकाल समोर

    पाच बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात

    आष्टी बाजार समितीमध्ये महाविकासआघाडीचे दोन उमेदवार निवडून आले तर एक ठिकाणी भाजपला यश

  • 30 Apr 2023 05:45 PM (IST)

    Majalgaon APMC Election Result 

    बीड : माजलगाव बाजार समिती निवडणूक

    आमदार प्रकाश सोळंके यांचे 11 उमेदवार विजयी

    तीन अपक्ष उमेदवारही विजयी

    भाजपच्या पारड्यात अद्याप तरी काहीच नाही

    आणखीन चार जागेवरील निकाल बाकी

  • 30 Apr 2023 05:44 PM (IST)

    Maharashtra APMC Election Result Live Update

    • राहाता, कोपरगाव, नेवासा, अकोले, श्रीरामपुर बाजार समितीच्या मतमोजणीला सुरूवात.
      जिल्हयातील बाजार समितीसाठी सरासरी 96 टक्के मतदान.
    • राहाता बाजार समिती निवडणुकीत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला.
    • राहाता बाजार समितीसाठी मोठी चूरस
    • राहाता बाजार समितीत भाजपला 3 जागा बिनविरोध. तर 18 पेकी 15 जागेसाठी मतमोजणी
    • भाजप – 03,  मविआ – 00
  • 30 Apr 2023 05:39 PM (IST)

    गोंदिया : सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत 18 पैकी 9 जांगाचे निकाल जाहीर

    BJP :- 06
    NCP :- 05

    एकूण 11 निकाल आले 7 निकाल बाकी.

  • 30 Apr 2023 05:25 PM (IST)

    गोंदिया – सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

    BJP : 6, NCP : 3,  Congress : 00

    एकूण 9 जागांचे निकाल हाती,  आणखी 9 जागांचा निकाल बाकी.

  • 30 Apr 2023 05:23 PM (IST)

    chhatrapati sambhaji nagar apmc election Result

    • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तीन बाजार समित्यांसाठी मतमोजणीला सुरुवात
    • फुलंब्री गंगापूर आणि लासुर बाजार समित्यांसाठी मतमोजणी सुरू
    • भाजप-शिवसेना युती आणि महाविकासआघाडीत चुरस
    • कोण मारणार बाजी याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
  • 30 Apr 2023 05:20 PM (IST)

    Washim APMC Election Result 2023

    वाशिम जिल्ह्यातील चार बाजार समितीची मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण पार पडली असून सरासरी 96 टक्के मतदान झाले.

    चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 72 संचालक पदाच्या जागेसाठी 182 उमेदवाराचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.

    चारही बाजार समितीची मतमोजणी आजच होणार आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 30 Apr 2023 05:18 PM (IST)

    GONDIA APMC Election Result BREAKING

    गोंदिया – गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी.

    भाजप आणि विद्रोही काँग्रेसने उघडले खाते.

    महाविकस आघाडी – 00

  • 30 Apr 2023 05:12 PM (IST)

    Gondia APMC Election Result 2023

    गोंदिया : सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले (BJP ) विशाल बागळकर ( BJP ) तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्मिता मेंढे ( मसाप ) खेमराज देशमुख ( मसाप ) विजयी. एकूण 18 पैकी 4 जागांचे निकाल घोषित.

  • 30 Apr 2023 05:00 PM (IST)

    Nandgaon APMC election Result 2023

    • शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीस थोड्याच वेळात सुरुवात होणार.
    • सुहास कांदे विरुद्ध मविआचे 5 माजी आमदार अशी लढत असून सुहास कांदे यांच्या बालेकिल्ल्यात मतदार कुणाच्या पारड्यात जड भरेल काही वेळातच स्पष्ट होईल.
    • सुहास कांदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल असून माविआ कडून परिवर्तन पॅनल यांच्यात लढत.
    • सुहास कांदे यांनी 100 % एकहाती सत्ता असल्याचा दावा केला असला तरी भुजबळ यांचीही रणनीती काय निकाल दाखवेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.