संतोष नलावडे, सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले ( Shivendra Raje Bhosale ) यांनी खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांच्यावर टीका केली आहे. फक्त पद भोगायची मात्र लोकांची कामे करायची नाहीत. यामुळेच मतदारांनी त्यांना नाकारलं असून उदयनराजे यांचा मार्केट कमिटीची जागा हडपण्याचा डाव आम्ही हाणुन पाडला. येणाऱ्या नगरपालिकेला लागलेलं उदयनराजेंचे ग्रहण हद्दपार करु. त्यांचा भ्रष्ठाचारी कारभार लोकांनी बघितलाय असं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. उदयनराजे यांची ताकत ही आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठाना कळाली असल्याचे सुद्धा शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ( Satara APMC Election Result ) आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं वर्चस्व पाहायला मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (उदयनराजे गटाला) धूळ चारत 18 जागांवर शिवेंद्रराजे गटाने विजय मिळवला आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजें भोसले यांचे पारडे जड असल्याचं दिसलंय.
कोरेगाव बाजार समितीत राष्ट्रवादीचा डंका