Maharashtra Assembly Budget Session 2024 : “इतर सरकारांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. मराठा समाज मागास आहे, हे माहित असताना आरक्षण दिलं नाही. वंचित ठेवलं. त्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले. एकनाथ शिंदेने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हे धाडस कोणी दाखवलं होतं का?” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याच काम चालू होतं. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा आरक्षण दिलं. त्यावेळेसदेखील दिलेल आरक्षण हायकोर्टात टिकलं. आम्ही होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झालं नाही. पुरावे द्यायला पाहिजे होते. 2008 नंतर बदलेली परिस्थिती कोर्टासमोर विषद करायली हवी होती. हे कोर्टासमोर मांडण्याची आवश्यकता होती. दुर्देवाने हे झालं नाही. म्हणून ते टिकलं नाही” असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.
“दिलेलं आरक्षण टिकणार नाही म्हणता, सांगा कसं टिकणार नाही? कुठेही चॅलेंज दिलं, तरी आम्ही उत्तर देणार. आम्ही बाजू मांडणार. 105 प्रमाणे अधिकार आले, हा निर्णय घेऊ शकतो, आम्हाला अधिकार आहे. मराठा आरक्षण टिकवणार” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणून तिथे गेलो, माझी काढली
मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या बदलत गेल्या, असं ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता हे मान्य केलं. “मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेऊन एकदा नव्हे, दोनदा गेलो. तिथे गर्दी होती, तरीही गेलो. आज मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजासाठी केलेलं काम स्वीकारण्याऐवजी टीका करत आहे. माझी काढली. सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत. एकेरी पद्धतीने उल्लेख केले. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. ही कार्यकर्त्याची भाषा नाही. राजकीय भाषा आहे. जाती-जातीमध्ये कोणाला भांडण लावता येणार नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.