Maharashtra Assembly By Election 2023 Results LIVE : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी

| Updated on: Mar 03, 2023 | 6:01 AM

Maharashtra Assembly By Election 2023 Result LIVE : चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात काँटे की टक्कर होत असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Assembly By Election 2023 Results LIVE : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी
Maharashtra Assembly by Election
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार असून आजच निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कसब्यात मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत. कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे. तर, चिंचवडमध्ये स्वर्गीय शंकर गावडे कामगार भवनात मतमोजणी होणार आहे. आधी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर 14 टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होतील. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Mar 2023 08:59 PM (IST)

    कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर रवींद्र धंगेकर दगडुशेठ गणपतीच्या दर्शनाला

    पुणे : 

    कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर रवींद्र धंगेकर दगडुशेठ गणपतीच्या दर्शनाला

    धंगेकर यांच्या हस्ते श्रीमंत दगडुशेठ गणपती बाप्पाची आरती

    शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धंगेकर पोहचले श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात

  • 02 Mar 2023 08:08 PM (IST)

    पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राहुल कलाटे यांची प्रतिक्रिया

    पुणे :

    “रवींद्र धंगेकरांप्रमाणे माझाही विजय झाला असता. मला उमेदवारी दिली असती तर चिंचवडमध्ये मविआचा आमदार झाला असता. 2024 ची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उद्यापासून तयारी सुरू करतोय”, अशी प्रतिक्रिया राहुल कलाटे यांनी दिली.

  • 02 Mar 2023 07:10 PM (IST)

    रवींद्र धंगेकर भाजप खासदार गिरीश बापट यांच्याही भेटीला जाणार

    पुणे : 

    रवींद्र धंगेकर आता विजयानंतर भाजप खासदार गिरीश बापट यांच्या भेटीला जाणार

    काँग्रेसच्या गोटात उत्साहाचं वातावण

  • 02 Mar 2023 05:06 PM (IST)

    औरंगाबाद ब्रेकिंग: कसब्यातील विजयानंतर काँग्रेसचा जल्लोष

    कसब्यातील विजयानंतर औरंगाबाद काँग्रेसचा जल्लोष

    शहागंज येथील काँग्रेस कार्यालयासमोर जल्लोष सुरू

    काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जल्लोष कार्यक्रमात सहभागी

    फटाके फोडून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष

  • 02 Mar 2023 04:52 PM (IST)

    रवींद्र धंगेकरांच्या रॅलीत हु इज धंगेकर अशा आशयाचा बॅनर

    पुणे : 

    रवींद्र धंगेकरांच्या रॅलीत हु इज धंगेकर अशा आशयाचा बॅनर

    चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला काँग्रेसचं उत्तर

    भाजपच्या 28 वर्षाच्या गडाला सुरूंग लावणारा व्यक्ती म्हणजे रविंद्र धंगेकर

    अशा आशयाचे बँनर हातात घेऊन चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

    या बँंनरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी

  • 02 Mar 2023 04:46 PM (IST)

    पुणे रविंद्र धंगेकर यांच्या विजयानंतर पुण्यात महविकास आघाडीची पत्रकार परिषद

    पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडत आहे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

    तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष आणि स्थानिक नेते एकत्रित घेणार पत्रकार परिषद

  • 02 Mar 2023 04:44 PM (IST)

    अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय

    हा माझा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे

    राहुल कलाटेमुळे मला फायदा झाला असं मला नाही वाटत हा आम्ही केलेल्या विकास कामांचा विजय आहे

    आज साहेब नाहीत पण त्यांचा आशिर्वाद आहे, त्यांचा विचार आमच्यासोबत आहे

    अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया

    त्यांनी केलेलं काम पुढे नेणार

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार

  • 02 Mar 2023 02:38 PM (IST)

    कसब्यातील विजयानंतर शिंदे – फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल

    ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

    कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचाच उमेदवार कसबा निवडणुकीत विजयी होत होता याची आठवण करून देतानाच चिंचवड पोटनिवडणूक आमचा भलेही पराभव झाला असला तरी विरोधात पडलेली मते एकत्र केली असती तर भाजपचा तिथेही पराभव झाला असता असेही जयंत पाटील म्हणाले.

    फडणवीस – शिंदे यांची जी युती झाली आहे त्याबाबत राज्यातील जनता प्रचंड नाराज आहे हे कसबा निवडणुकीतून समोर आले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

  • 02 Mar 2023 01:02 PM (IST)

    By Election 2023 Results | निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील आणि प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल करावा

    नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकरांची मागणी

     

  • 02 Mar 2023 01:00 PM (IST)

    पिंपरी चिंचवड 19 वी फेरी

    पिंपरी चिंचवड 19 वी फेरी

    नाना काटे ५५८४८

    अश्विनी जगताप ६७५५६

    राहुल कलाटे २२३१७

  • 02 Mar 2023 12:34 PM (IST)

    पिंपरी चिंचवड सतरावी फेरी

    पिंपरी चिंचवड सतरावी फेरी

    नाना काटे ५०६२२

    अश्विनी जगताप ६१४७३

    राहुल कलाटे १९४०५

  • 02 Mar 2023 12:28 PM (IST)

    kasba peth Assembly Election Result 2023 Live : विजय साजरा करणार नाही – अश्विनी जगताप

    पुणे : लक्ष्मण जगताप यांना जाऊन दीड महिने झालेत,

    या दुःखत प्रसंगी विजय साजरा करणार नाही,

    हे सर्व श्रेय लक्ष्मण जगताप श्रध्दांजली म्हणून अर्पण करणार.

  • 02 Mar 2023 12:19 PM (IST)

    पिंपरी चिंचवड सोळावी फेरी

    पिंपरी चिंचवड सोळावी फेरी

    नाना काटे ४६७२२

    अश्विनी जगताप ५७५५०

    राहुल कलाटे १८२६६

  • 02 Mar 2023 12:06 PM (IST)

    कसबा पेठेत भाजपच्या वर्चस्वाला धक्का

    काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय

    भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा दारुण पराभव

     

  • 02 Mar 2023 12:03 PM (IST)

    कसब्यात २८ वर्षांनी इतिहास घडला

    कसब्यात २८ वर्षांनी इतिहास घडला

    काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी

    तब्बल ११ हजार ४० मतांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव

  • 02 Mar 2023 11:54 AM (IST)

    कसबा पेठ आठरावी फेरी

    कसबा पेठ आठरावी फेरी

    रवींद्र धंगेकर ६७,९५३

    हेमंत रासने ५८,९०४

  • 02 Mar 2023 11:49 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पंधरावी फेरी

    पिंपरी चिंचवड पंधरावी फेरी

    नाना काटे ४०,७५७

    अश्विनी जगताप ४९,२३६

    राहुल कलाटे १४,९६४

  • 02 Mar 2023 11:39 AM (IST)

    कोणताही विशिष्ट समाज कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नाही – राऊत

    कोल्हापूर : लोकांच्या मतांमध्ये परिवर्तन होतय, कसबा निवडणुकीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया,

    निवडणूक आयोगाचे आयुक्त सरकारद्वारे नेमायला सुप्रीम कोर्टाने विरोध दर्शवलाय,

    यावर यापूर्वीच आक्षेप घेतला होता, निवडणूक आयोग सरकारच्या हातातलं बाहुलं आहे – राऊत

    ह्याच निवडणूक आयोगाने हेतू परस्पर शिवसेना दुसऱ्याच्या ताब्यात दिली,

    मिंदे गट निकाला आधीच शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हाला मिळेल म्हणत होता – राऊत

  • 02 Mar 2023 11:37 AM (IST)

    पिंपरी चिंचवड तेरावी फेरी

    पिंपरी चिंचवड तेरावी फेरी

    नाना काटे ३७,९३४

    अश्विनी जगताप ४६,३२०

    राहुल कलाटे १४१७१

  • 02 Mar 2023 11:26 AM (IST)

    आमच्यामुळे कसब्यात भाजप विजयी होत होता- राऊत

    आमच्यामुळे कसब्यात भाजप विजयी होत होता- राऊत

    कसब्यात गेली 40 वर्ष भाजप शिवसेनेच्या पांठिब्यावर निवडून आला

    आज शिवसेना मविआ सोबत आहे त्यामुळे धंगेकर जिकंत आहेत

    कसबातील भाजपचा गड कोसळणार

    चिंचवडमध्येही भाजपला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही

  • 02 Mar 2023 11:24 AM (IST)

    पिंपरी चिंचवड बारावी फेरी

    पिंपरी चिंचवड बारावी फेरी

    नाना काटे ३४३२९

    अश्विनी जगताप ४२६७१

    राहुल कलाटे १३१४४

  • 02 Mar 2023 11:23 AM (IST)

    कसबा पेठ पंधरावी फेरी

    कसबा पेठ पंधरावी फेरी

    रवींद्र धंगेकर ५६,४९७

    हेमंत रासने ५०,४९०

  • 02 Mar 2023 11:23 AM (IST)

    चौदाव्या फेरी अखेरीस रविंद्र धंगेकर आघाडीवर

    चौदाव्या फेरी अखेरीस रविंद्र धंगेकर आघाडीवर

    काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

    50 खोके एकदम ओकेच्या घोषणा

  • 02 Mar 2023 11:18 AM (IST)

    कसबा पेठ चौदावी फेरी

    कसबा पेठ चौदावी फेरी

    रवींद्र धंगेकर ५२८३१

    हेमंत रासने ४७५४६

  • 02 Mar 2023 11:13 AM (IST)

    पिंपरी चिंचवड अकरावी फेरी

    पिंपरी चिंचवड अकरावी फेरी

    नाना काटे ३१,१९४

    अश्विनी जगताप ३९,९१८

    राहुल कलाटे १५,२४५

  • 02 Mar 2023 11:11 AM (IST)

    कुणाल टिळक काय म्हणतात

    धंगेकर आघाडीवर असले तरी कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने 3 ते 4 हजार मातांनी निवडून येतील
    शेवटच्या फेरीपर्यंत चित्र स्पष्ट होईल
    मतदारांचा विश्वास भाजपलाच
  • 02 Mar 2023 11:06 AM (IST)

    कसबा पेठ तेरावी फेरी

    कसबा पेठ तेरावी फेरी

    रवींद्र धंगेकर ४९,१२०

    हेमंत रासने ४४,०३४

    आनंद दवे १२१

  • 02 Mar 2023 11:02 AM (IST)

    कसबा पेठ बारावी फेरी

    कसबा पेठ बारावी फेरी

    रवींद्र धंगेकर ४५,६३८

    हेमंत रासने ४०,७६१

    आनंद दवे १२१

  • 02 Mar 2023 10:59 AM (IST)

    पिंपरी चिंचवड दहावी फेरी

    पिंपरी चिंचवड दहावी फेरी

    नाना काटे २८,४३१

    अश्विनी जगताप ३५,९३५

    राहुल कलाटे ११,४२६

  • 02 Mar 2023 10:49 AM (IST)

    कसबा पेठ अकरावी फेरी

    कसबा पेठ अकरावी फेरी

    रवींद्र धंगेकर ४११८८

    हेमंत रासने ३७९५५

    आनंद दवे १००

  • 02 Mar 2023 10:47 AM (IST)

    पिंपरी चिंचवड नववी फेरी

    पिंपरी चिंचवड नववी फेरी

    नाना काटे २५८३२

    अश्विनी जगताप ३२२८६

    राहुल कलाटे १०७०२

  • 02 Mar 2023 10:46 AM (IST)

    कसबा पेठेतील मतमोजणीवर बावनकुळे काय म्हणतात

    कसबा आणि चिंचवडमध्ये होत असलेल्या निवडणुकीत कसब्यामध्ये सध्या आम्ही मागे दिसत असलो तरी सगळे चित्र हे दहाव्या फेरीनंतर स्पष्ट होते

    सध्या मागे असलो तरी निकाल आमच्या विरोधात आहे हे आता सांगणे कठीण आहे

    निवडणुकीत कुठलीही प्रतिष्ठा पणाला लावली नव्हती. इतर निवडणुकीप्रमाणेच निवडणूक लढलो

    जर आमचा पराजय झाला तर का झाला याची कारणे शोधले जाईल

  • 02 Mar 2023 10:44 AM (IST)

    Chinchwad Election Result 2023 Live : राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या कार्यालय बाहेर सन्नाटा

    राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा नाना काटे यांना धक्का

    अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांना मिळाली 10 हजार मते

    नाना काटे यांना 23 हजार 710 मते

    तर भाजप उमेदवार अश्विनी जगताप या 28727 मते घेऊन आघाडीवर

    काटे यांच्या घरी आणि कार्यालयात शांतता

     

  • 02 Mar 2023 10:41 AM (IST)

    कसबा पेठ दहावी फेरी

    कसबा पेठ दहावी फेरी

    रवींद्र धंगेकर ३८,२६३

    हेमंत रासने ३४,०३६

    आनंद दवे १००

  • 02 Mar 2023 10:37 AM (IST)

    राज्यातील पोटनिवडणुकीची आज मतमोजणी, अनिल देसाई यांची प्रतिक्रिया

    राज्यातील पोटनिवडणुकीची आज मतमोजणी

    अनिल देसाई यांची प्रतिक्रिया

    कसबा निवडणूकीतून परिवर्तन दिसतंय

    भाजपनं पोकळ आश्वासनं दिली

    तुम्ही आम्हाला काय विश्वास दिला होता ?

    महागाई कंबरडे मोडतेय.

    मतदार नाराज आहे.

    शेतकरी निराश आहेत…

    राज्यातून उद्योग बाहेर जाताहेत

  • 02 Mar 2023 10:31 AM (IST)

    पिंपरी चिंचवड आठवी फेरी

    पिंपरी चिंचवड आठवी फेरी

    नाना काटे २३,७१०

    अश्विनी जगताप २८,७२७

    राहुल कलाटे १०,०४८

  • 02 Mar 2023 10:26 AM (IST)

    कसबा पेठ नववी फेरी

    कसबा पेठ नववी फेरी
    रवींद्र धंगेकर ३४,७७८
    हेमंत रासने ३०,२७२
    आनंद दवे १००

  • 02 Mar 2023 10:22 AM (IST)

    kasba peth Assembly Election Result 2023 Live : कसबा निवडणूकीतून परिवर्तन दिसतंय

    नवी दिल्ली : भाजपनं पोकळ आश्वासने दिली.

    तुम्ही आम्हाला काय विश्वास दिला होता ?

    महागाई कंबरडे मोडतेय. मतदार नाराज आहे.

    शेतकरी निराश आहेत. राज्यातून उद्योग बाहेर जाता आहेत.

    कसबा निवडणूकीवर अनिल देसाई यांची प्रतिक्रिया.

  • 02 Mar 2023 10:18 AM (IST)

    अश्विनी जगताप मंदिरात

    अश्विनी जगताप यांना सातव्या फेरीअखेरी मोठी आघाडी

    जगताप पुण्यातील श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिरात दर्शनासाठी दाखल

  • 02 Mar 2023 10:16 AM (IST)

    पिंपरी चिंचवड सातवी फेरी

    पिंपरी चिंचवड सातवी फेरी
    नाना काटे २०,९४५
    अश्विनी जगताप २५,१२५
    राहुल कलाटे ८,९९६

  • 02 Mar 2023 10:12 AM (IST)

    कसबा पेठ आठवी फेरी

    कसबा पेठ आठवी फेरी
    रवींद्र धंगेकर ३०,५३७
    हेमंत रासने २७,१८७
    आनंद दवे १००

  • 02 Mar 2023 10:02 AM (IST)

    कसबा पेठ सातवी फेरी

    कसबा पेठ सातवी फेरी
    रवींद्र धंगेकर २५,९०४
    हेमंत रासने २४,६३३
    आनंद दवे १००

  • 02 Mar 2023 09:59 AM (IST)

    पिंपरी चिंचवड सहावी फेरी

    पिंपरी चिंचवड सहावी फेरी
    नाना काटे १७८३७
    अश्विनी जगताप २१२३७
    राहुल कलाटे ७९०७

  • 02 Mar 2023 09:58 AM (IST)

    kasba peth Assembly Election Result 2023 Live : कसब्यातील सहाव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर

    रवींद्र धंगेकर यांना सहाव्या फेरी अखेर 23 हजार 80 मते

    भाजपच्या हेमंत रासने यांना 20 हजार 363 मते

    हिंदू महासंघाचे आनंद दवे यांना 100 मते

    रवींद्र धंगेकर 2 हजार 717 मतांनी आघाडीवर

  • 02 Mar 2023 09:53 AM (IST)

    कसबा पेठ सहावी फेरी

    कसबा पेठ सहावी फेरी
    रवींद्र धंगेकर २३,०८०
    हेमंत रासने २०,३६३
    आनंद दवे १००

  • 02 Mar 2023 09:49 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पाचवी फेरी

    पिंपरी चिंचवड पाचवी फेरी
    नाना काटे १५६८२
    अश्विनी जगताप १७२३०
    राहुल कलाटे ५७६६

  • 02 Mar 2023 09:42 AM (IST)

    कसबा पेठ पाचवी फेरी

    कसबा पेठ पाचवी फेरी
    रवींद्र धंगेकर १९०२०
    हेमंत रासने १७०५३
    आनंद दवे १००

  • 02 Mar 2023 09:36 AM (IST)

    कसबा पेठ चौथी फेरी

    कसबा पेठ चौथी फेरी
    रवींद्र धंगेकर १४८९१
    हेमंत रासने १४३८२
    आनंद दवे १००

  • 02 Mar 2023 09:35 AM (IST)

    पिंपरी चिंचवड चौथी फेरी

    पिंपरी चिंचवड चौथी फेरी
    नाना काटे १२,८३२
    अश्विनी जगताप १३,९३१
    राहुल कलाटे ४,५९९

  • 02 Mar 2023 09:27 AM (IST)

    kasba peth Assembly Election Result 2023 Live : कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी

    अभिजित बिचुकले यांना 4 मतं

    तर हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांना 12 मतं

    रविंद्र धंगेकर यांना 11, 157 मतं

    हेमंत रासने यांना 10, 673 मतं

  • 02 Mar 2023 09:23 AM (IST)

    कसबा पेठ तिसरी फेरी

    कसबा पेठ तिसरी फेरी
    रवींद्र धंगेकर ११,१५७
    हेमंत रासने १०,६७३
    आनंद दवे १२

  • 02 Mar 2023 09:13 AM (IST)

    पिंपरी चिंचवड तिसरी फेरी

    पिंपरी चिंचवड तिसरी फेरी
    नाना काटे ७२०६
    अश्विनी जगताप ७८८२
    राहुल कलाटे २६४५

  • 02 Mar 2023 09:06 AM (IST)

    १५ हजार मतांनी निवडून येईल-नाना काटे

    पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.  त्यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचं सांगितलं तर भाजपकडून राजकारण केल्याचं देखील त्यांनी टीका केली आहे. तसेच अनेक दिग्गजांनी माझ्यासाठी प्रचार केला असून दहा ते पंधरा हजार मतांनी मी निवडून येईल असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला

  • 02 Mar 2023 09:05 AM (IST)

    अश्विनी जगताप काय म्हणतात

    पोस्टल मतदानात आघाडीवर आहे ही साहेबाच्या केलेल्या कामाची पावती आहे

    आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढविली

    मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास करणार

    माझा विजय हा निश्चित आहे

  • 02 Mar 2023 09:01 AM (IST)

    पिंपरी चिंचवड दुसरी फेरी

    पिंपरी चिंचवड दुसरी फेरी
    नाना काटे ७२०६
    अश्विनी जगताप ७८८२
    राहुल कलाटे २६४५

  • 02 Mar 2023 08:57 AM (IST)

    कसबा पेठ

    कसबा पेठ
    रवींद्र धंगेकर ५०००
    हेमंत रासने २८००

  • 02 Mar 2023 08:55 AM (IST)

    Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 470 मतांनी आघाडीवर

    अश्विनी जगताप यांना 4 हजार 471 मते

    राष्ट्रवादीच्या नाना कलाटे यांना 3 हजार 701 मते

    अपक्ष राहुल कलाटे यांना 1 हजार 674 मते

  • 02 Mar 2023 08:47 AM (IST)

    Kasba Peth Assembly Election Live : कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

    कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

    पहिल्या फेरीत रविंद्र धंगेकर आघाडीवर

    कसबा पोटनिवडणूकीसाठी आज मतमोजणी

    भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला

    कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी

    मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून 20 फेऱ्या होणार आहेत

  • 02 Mar 2023 08:46 AM (IST)

    चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप आघाडीवर

    पुणे : चिंचवडमध्ये अश्विनी जगताप मोठ्या आघाडीवर,

    अश्विनी जगताप यांना 4053 मत मिळाली आहे,

    नाना काटे यांना 3604 मत तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1273 मत.

  • 02 Mar 2023 08:42 AM (IST)

    चिंचवड पोटनिवडणूक पहिल्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर

    चिंचवड : पोस्टल मतांमध्ये ही अश्विनी जगताप आघाडीवर,

    दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे नाना काटे,

    तिसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे,

    अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यामध्ये चुरस.

  • 02 Mar 2023 08:39 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पहिल्या फेरीत

    पिंपरी चिंचवड पहिल्या फेरीत
    नाना काटे ३६०४
    अश्विनी जगताप ४०५३
    राहुल कलाटे १२७३

  • 02 Mar 2023 08:32 AM (IST)

    कसबा पेठेत पोस्टल मतांमध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर

    कसबा पेठेत पोस्टल मतांमध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर

    पोस्टल मतांमध्ये हेमंत रासने पिछाडीवर

    पोस्टल मतमोजणी पूर्ण

  • 02 Mar 2023 08:18 AM (IST)

    पोस्टल मतमोजणीत अश्विनी जगताप आघाडीवर

    अश्विनी जगताप यांना पोस्टल मतमोजणीत 300 मते

    चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात

    राज्याचं लक्ष चिंचवडकडे

     

  • 02 Mar 2023 08:17 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पोस्टल मतांमध्ये भाजप आघाडी

    पोस्टल मतमोजणीत अश्विनी जगताप आघाडीवर

    जगताप ३०० मतांनी आघाडीवर

  • 02 Mar 2023 08:14 AM (IST)

    आधी पोस्टल मते मोजली जाणार, पहिली फेरी पोस्टल मतमोजणीची

    पोस्टल मतांबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीममधून देखील मतांच्या मोजणीला सुरुवात

    ईव्हीएम मोजणी 8.30 नंतर सुरुवात होणार

  • 02 Mar 2023 08:02 AM (IST)

    मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पोस्टल मतं मोजली जाणार

    मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पोस्टल मतं मोजली जाणार

    पोस्टल मतांबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम मधून देखील मतांची मोजणीला सुरुवात

    इव्हीएम मोजणी ८.३० नंतर सुरुवात होणार

  • 02 Mar 2023 08:00 AM (IST)

    कसबा गणपतीचा आशिर्वाद मला मिळणार

    पुणे : मी कार्यकर्ता आहे असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहे.

    गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी आलोय, माझा विजय निश्चित आहे

    मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकरांनी केली गणपतीची आरती

  • 02 Mar 2023 07:48 AM (IST)

    मतमोजणीच्या ३७ फेऱ्या

    चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक

    मतमोजणी आज गुरुवार २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे.

  • 02 Mar 2023 07:33 AM (IST)

    कुठल्याही प्रकारचा जल्लोष आणि रॅली विजय मिरवणूक काढण्यास पिंपरी चिंचवड पोलिसांची बंदी

    कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी याची अंमलबजावणी सुरू

    सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांची माहिती

    मतदान निकालापूर्वी उमेदवारांची देवपूजा, निकालाची धाकधूक वाढली

  • 02 Mar 2023 07:15 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार

    पुणे : काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची फडणवीसांच्या विरोधात तक्रार,

    आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल,

    प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा फडणवसांकडून प्रयन्त.

  • 02 Mar 2023 07:13 AM (IST)

    माझा विजय निश्चित आहे, यापूर्वीच माझा विजय निश्चित होता – धंगेकर

    पुणे : मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली,

    15 हजाराच्या फरकाने मी निवडून येणार आहे,

    उमेदवारी दिली तेव्हाच विजय झाला होता,

    प्रचार आणि इतर सोपस्कार पाडावे लागले.

  • 02 Mar 2023 06:28 AM (IST)

    कसब्यात सुमारे दीड लाख मतदारांचा कौल कुणाला? आज होणार स्पष्ट

    कसब्यात एकूण 275679 मतदार

    झालेले मतदान 138018

    मतदानाची टक्केवारी 50.6℅

  • 02 Mar 2023 06:27 AM (IST)

    कसबा पोटनिवडणूकीसाठी आज मतमोजणी, आजच निकाल लागणार

    8 वाजता सुरू होणार मतमोजणी

    भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला

    कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये होणार मतमोजणी

    मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून 20 फेऱ्या होणार आहेत

  • 02 Mar 2023 06:25 AM (IST)

    चिंचवडमध्ये एकूण 2 लाख 87 हजार 145 मतदारांचा कौल कुणाला?, आज होणार फैसला

    5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 2 लाख 87 हजार 145 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

    चिंचवडमध्ये एकूण 50.47 टक्के इतकं मतदान झालं

  • 02 Mar 2023 06:21 AM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी

    सकाळी 8 वाजता स्वर्गीय शंकर गावडे कामगार भवनात होणार मतमोजणीला सुरुवात

    यानंतर 14 टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होतील

    सुरुवातीला टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात होईल

    भाजप उमेदवार अश्विनी जगताप, मविआचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या भवितव्याचा फैसला

    विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला