महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर आहे. सर्वच राजकीय पक्ष आता बंडोबांची समजून घालून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. महाराष्ट्रात 51 ठिकाणी विधानसभेच्या जागांवरती शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना आहे. “महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणून बुजून टार्गेट केलं जातय. मराठा समाजाला जेवढा न्याय शिंदे साहेब यांनी दिलाय, तेवढाच न्याय सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 2014 ते 2019मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने जेवढे निर्णय मराठा समाजासाठी घेतले, तेवढे निर्णय आजपर्यंत कोणत्याच नेत्यांनी घेतले नाहीत” असं दापोलीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम म्हणाले.
वसईच्या सातीवली येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज येथील एकी गाळ्याला भीषण आग लागली आहे. यात प्लास्टिकचे मटेरीयल होते. आगीने रौद्र रुप धारण केलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसली, तरी कंपनीतील सर्व सामान जळून खाक झालं आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी फटाक्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. वसई विरार पालिकेचे अग्निशमनदलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवलं असून आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. ही भेट मुरबाड मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू शकते. म्हात्रे यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला असून, ही भेट त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकते. निवडणुकीपूर्वीच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी राजीनामा दिला आहे. वैभव कांबळे यांनी छातीवरील शेतकरी संघटनेचा बिल्ला काढला. वैभव कांबळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी आमदार सुजित मिंचेकरांना उमेदवारी दिल्याने वैभव कांबळे यांचा संताप झाला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. ते भाजपाच्या खासदार स्मिता वाघ यांचाही प्रचारात सहभाग झाले. अमळनेर शहरात बाजारपेठेतील व्यापारी व्यवसायिकांसह नागरिकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. जनतेच्या आशीर्वादाने 23 तारखेला आम्हीच विजयाचे फटाके फोडणार असा विश्वास मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोना चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. एका दिवसात सोन्याचे दर १००० रुपयांनी घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 81 हजार 500 रुपये एवढे आहेत. चांदीच्या दर एक लाखांपर्यंत पोहोच ले असून जीएसटीसह चांदीचे दर 99 हजार 200 रुपये एवढे आहेत.
यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंतांना जनता निवडून देईल. सामंत बंधूंचं आव्हान कधी नव्हतं आणि असणारही नाही. सामंत इकडून तिकडे तिकडून इकडे असंच करत राहिले आहेत. पैसा आणि सत्ता या जोरावरती आपण जिंकू असं त्यांना वाटतंय. सामंत यांच्याकडे सत्ता आणि पैसा आहे तर आमच्याकडे निष्ठा आहे, असं उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवी म्हणाले.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेसाठी मतदान होणार आहे. परंतु राज्यातील हा 12 ते 15 लाख असलेला मतदार निवडणूक काळात स्थलांतरित झालेला असल्याने या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभेसाठी उत्तर महाराष्ट्रात दोन सभा होतील. नाशिकला आणि धुळ्याला सभा होईल. रेकॉर्ड ब्रेक सभा होतील. नाशिकच्या ग्राउंड ला तर मोदी ग्राउंड नाव दिले आहे. लाखोंची सभा होईल, अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली.
सण-उत्सवाच्या काळात फुलांच्या मार्केटमध्ये मोठी वर्दळ असते. अहिलादेवी नगरच्या फुल मार्केटमध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाली होती. सकाळपासून 120 ते 250 रुपये किलोपर्यंत दर झेंडूचे झाले आहे.
जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोना चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. एका दिवसात सोन्याचे दर १००० रुपयांनी घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह 81 हजार 500 रुपये आहेत.
संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. 25 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धाराशिव कळंब विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी वाद मात्र कायम असल्याच दिसत आहे. तिकिट वातपा नंतर शिवसेनेमधला अंतर्गत कलह उफाळून येताना दिसतोय. जिल्ह्यातील बड्या नेतेने माझा पत्ता कट केला असा आरोप करत धाराशिव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
मुंबादेवी विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबद्दल उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो. अरविंद सावंत यांनी माफी मागितली पाहिजे, असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
“एका जातीवरती या राज्यात निवडणुका जिंकवणं सोपं नाही. त्यामुळे समीकरणं आवश्यक आहेत. आता जरी मराठा, दलित, मुस्लिम एकत्र आले तरी छोटया छोटया जाती या आपल्या लेकरांसाठी एकत्र येणार आहेत. तीन तारखेच्या आत खूप मोठे बांधव भेटी घेऊन ठरवणार आहेत की आपण एकत्र आलं पाहिजे. आता मराठ्यांचा विश्वास वाढला, आता मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात एकजुटीने चालणार आहे,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
बंडखोरांना समजावून सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. बंडखोरांना समजावण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील बंडखोरांबद्दल दिली.
“लोकसभा निवडणुकीच्या वेळी परिस्थिती वेगळी होती आणि आता वेगळी आहे. लोकसभेत काही ठिकाणी एकाच मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदान विरोधकांना झाला. लोकसभा निवडणुकीनंतर आमही लोककल्याण योजना आणल्या. माझ्या ही मतदारसंघात काही जण जण सोडून गेले आहेत. मात्र पुन्हा आमची सत्ता आल्यावर या लोकांना कळेल,” असं गिरीश महाजन म्हणाले.
“कालपासून मी नाशिकमधील मतदारसंघाचा आढावा घेत आहे. नेत्यांसोबत चर्चा करत आहे. गेल्या 5 वर्षात नाशिकमध्ये देखील चांगलं काम झालं आहे. काही नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या अडचणी होत्या. मात्र या सर्व मुद्द्यावर चर्चा झाली आणि मार्ग देखील काढण्यात आले आहेत. – काल रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. महायुती म्हणून जोरदार आम्ही प्रचार करणार आहोत. शहरातील तीनही जागा भाजप जिंकणार,” असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
“मी उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी निवडणूक लढणार आणि जिंकणार. मुख्यमंत्री शिंदेंनी एकदा आशीर्वाद दिलेत. निवडणूक एकतर्फी करायची हे मतदारांनीच ठरवलं. कौटुंबिक जिव्हाळ्याच्या संबंधामुळे ठाकरे गटच माघार घेईल. मी लढणारा शिवसैनिक आहे, मागच्या दाराने जाणारा नाही,” असं सदा सरवणकर म्हणाले. माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत.
मी उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच नाही. महायुतीत मनसे नाही हे फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं आहे. ठाकरे गटाचे महेश सावंत हेच माघार घेऊ शकतील. मी निवडणूक लढवणार आणि जिंकणारही – सदा सरवणकर यांनी व्यक्त केला विश्वास.
शायना एन. सी. यांच्याबद्दल उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो. अरविंद सावंत यांनी माफी मागितली पाहिजे. कारण एका महिलेचा सन्मान करण्याची पद्धत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना शिकवलेली आहे, परंतु त्याच्या विपरीत काम अरविंद सावंत यांनी केले आहे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.
सातपुड्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या अस्तंबा ऋषी पर्वतावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे . हा तरूण अस्तंबा ऋषी या त्रि उत्सवा दरम्यान दर्शनासाठी शिखरावर गेला होता . मात्र अचानक भोवळ आल्याने उंच शिखरावरून खोल दरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. खोल दरीत पडलेला मृतदेह अखेर देऊन दिवसानंतर बाहेर काढण्यात आला. निखिल वाडीले असा मृत तरुणाचं नाव असून शहादा तालुक्यातील रहिवासी आहे.
कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली . काही दिवसांपूर्वी घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केला होता.
राज्याच्या डिजी रश्मी शुक्ला यांना सचिन वाझे समजता का ? कर नाही तर डर कशाला ? नितेश राणे यांनी मविआवर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत यांच्या मनातील काळबेरं बाहेर आलंय, भीती बाहेर पडते आहे.
आमचं तिसर नेत्र आहे. आम्ही महायुती आणि महाविकासआघाडीवर त्रिशूलसारखा वार करु. महायुती आणि महाविकास आघाडीच्या धोरणावर त्यांच्या घराणेशाहीवर आम्हाला वार करायचा आहे. अनेक आजी माजी आमदार आमच्या संपर्कात आहे. येत्या चार तारखेला आम्ही कोण किती पाण्यात आहे हे सांगू. तसेच किती लोक आमच्यासोबत आहे हे देखील सांगू. बंडखोरांचे बंड हे सामान्य माणसासाठी असेल तर नक्कीच त्याना प्रहार ताकद देईल. मी एकूण 70 सभा घेणार आहे, असे विधान बच्चू कडू यांनी केले.
नवी मुंबईमधील सानपाडामधील भीषण अपघात घडला आहे. सानपाडा पोलीस हद्दीमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने रस्त्यावरील लोकांना उडवल्याची घटना घडली आहे. वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. या अपघातात काही व्यक्ती जखमी झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ड्रँक अँड ड्राईव्ह प्रकारातील आहे. सध्या सानपाडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
विधानसभेला त्यांचा पराभव ठरलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं की देवेंद्र फडणवीसांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू द्यायचं नाही. त्यामुळे त्यांचा निश्चित पराभव होईल – संजय राऊत
आमचे फोन आजही टॅप केले जातात. देवेंद्र फडणवीस सत्तेवर येताच शुक्लांना पुन्हा पदावर घेतले गेले. रश्मी शुक्लांना का हटवलं जात नाही. रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी निवड बेकायदेशीर आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला
दिवाळीच्या सणादरम्यान झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खालावली. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च (SAFAR) नुसार आज राजधानी दिल्लीतील एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या (स्तरावर) पोहोचला आहे. आनंद विहार इथं AQI 419 वर पोहोचला आहे. जेएलएन स्टेडियम मध्ये AQI 374 वर पोहोचला, जो अतिशय खराब श्रेणीत आहे. जहांगिरपुरी आणि द्वारका इथला AQI 395 इतक्या खराब स्तरावर पोहोचला आहे.
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. जवळपास 60 गावांना भेटी देण्याचा कार्यक्रम आहे. “आम्ही वेगवेगळ्या घटकांना आरक्षण देण्याच्या बाजूचे आहोत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आम्ही आरक्षण देण्याच्या बाजूचे आहोत” असं अजित पवार म्हणाले.
“एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल जातं. निवडणुकीत काम करून घेतलं जातं. नंतर पाच वर्षे त्यांना विचारले जात नाही. याच कारणामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक लढवणार ठाम आहे” असं भाजपचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी स्पष्ट केलं आहे. जळगाव शहर मतदार संघातून विद्यमान भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात बंडखोरी करत भाजपचे डॉ. अश्विन सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काल रात्री जवळपास 2 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात चर्चा झाली. सरवणकर आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. फॉर्म मागे घेणार नाहीत असं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याने पेच वाढला आहे. या बाबत पुन्हा एकदा विचार करा असा मुख्यमंत्री यांचा सल्ला. युतीधर्म पाळावा लागेल अशी सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिली आठवण. या मोबदल्यात तुम्हाला किंवा मुलीला विधान परिषदेचीही ऑफर दिल्याची माहीती. 4 तारखेपर्यंत योग्य तो निर्णय घ्या, उमेदवारी अर्ज मागे घ्या, असा सरवणकर यांना अल्टिमेटम