महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने काही नेत्यांनी थेट बंडखोरी केली आहे. या बंडोबांना आता शांत करण्याच राजकीय पक्षांसमोर आव्हान आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने 102, शरद पवार गटाने 83 आणि उद्धव ठाकरे गटाने 84 उमेदवारांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अमित ठाकरे यांचा विजयाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सदा सरवणकरांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात पोलिसांचा रुट मार्च झाला. शहरातील विविध भागातून काढण्यात आला रुट मार्च. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कायम रहावी म्हणून पोलिसांकडून हा रुट मार्च काढण्यात आला. गेल्या काही दिवसात रत्नागिरी शहरात निर्माण झाली होती सामाजिक तेढ.
बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरु आहेत. महायुतीचे तीनही प्रमुख नेते बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. बंडोबांमुळे महायुतीला फटका बसू नये यासाठी तीनही नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न आहे. उद्या रात्री उशिरा तीनही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे.
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान आणि सलमान खान यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडाच्या सेक्टर 39 परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याचे वय 20 वर्षे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीची माफी मागतो की मी तुमची सेवा करू शकणार नाही. मला कळेल की तुम्हाला त्रास होत आहे, पण मी तुम्हाला मदत करू शकणार नाही, कारण त्यांच्या राजकीय हितसंबंधांमुळे दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकार ‘आयुष्मान भारत योजने’मध्ये सामील होत नाहीये. ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना ‘आयुष्मान योजने’ अंतर्गत आणण्यात आले आहे.
दिल्ली पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी मिळून NCR, दिल्लीमध्ये एका गुप्त ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यात मेथॅम्फेटामाइन नावाचे औषध तयार होते. पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकून सुमारे 95 किलो ड्रग्ज जप्त केले. याशिवाय अनेक रसायने आणि आयात केलेली यंत्रसामग्रीही जप्त करण्यात आली आहे.
उत्तराखंडमधील एम्स ऋषिकेश येथे आजपासून हेली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली आहे. याशिवाय ड्रोनद्वारे दुर्गम भागात औषधे पाठवण्यासाठी ड्रोन सेवाही सुरू करण्यात आली होती. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राम मोहन नायडू उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मोहन जगताप हे माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मनोज जरांगे पॅटर्न हा माजलगाव विधानसभा मतदार संघात चालत असल्याने ही भेट महत्त्वाची मनाली जाते.
एकनाथ शिंदे यांचे माजी खाजगी सचिव बालाजी खतगावकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. महायुतीने भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी दिली आहे. बालाजी खतगावर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मागितली होती. मुखेड मतदारसंघ भाजपला सुटल्याने खतगावकर यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे खतगावकर यांनी अपक्ष अर्ज केला आहे. त्यामुळे महायुतीचे तुषार राठोड विरुद्ध बालाजी खतगावकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.
राज्यातील बंडखोरी संदर्भात उद्या आम्ही सर्वजण बसणार आहोत असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले आहे
शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी ऐरोली विधानसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे
उमेदवारी न मिळाल्याने अस्वस्थ झालेले श्रीनिवास वनगा आपली इनोव्हा कार आणि बॉडीगार्डला न सांगता पायी घर सोडून निघून गेले आहेत
जामनेर मतदार संघातून मंत्री गिरीश महाजन यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन केले. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते गिरीश महाजन यांच्या उमेदवारी दाखल करण्यासाठीच्या रॅलीमध्ये सहभागी झाले. राज्यात सर्वात जास्त मतांनी जमनेरची जागा निवडून येईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या दिवशी माजी आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला. मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल जगताप यांच्या मिरवणुकीत आणि सभास्थळी बॅनरवर शरद पवारांचे फोटो झळकले.
अभिजीत बिचकुले यांनी बारामतीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार विरुद्ध पवार लढाईमध्ये अभिजीत बिचकुले याने उडी घेतली आहे.
लातूरमध्ये भाजपाला धक्का, माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपा सोडली आहे. थोड्याच वेळात शृंगारे काँग्रेस पक्षात जाणार आहेत. अमित देशमुखांच्या रॅली दरम्यान शृंगारे काँगेसमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा पराभवानंतर सुधाकर शृंगारे भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराज हो
31 तारखेला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण फायनल बैठक असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. हेलिकॉप्टर, विमानाने येणार महत्त्वाचे धर्मगुरू येणार आहेत.महाराष्ट्रातील इतर मराठा समाज बांधवांनी 31 तारखेला अंतरवाली सराटीत येऊ नये जरांगे पाटलांनी आव्हान केले आहे.
गडचिरोली अहेरी विधानसभेत कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज महायुती अजित पवार गटातून आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करताना स्थानिक पदाधिकारी आणि मतदारसंघातील पाच तालुक्यात आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. अहेरी मतदारसंघात कॅबिनेट मंत्री आत्राम विरुद्ध त्यांचे पुतण्या अमरीश राव आत्राम व कन्या भाग्यश्री आत्राम यांची लढत पाहायला मिळणार आहे
राष्ट्रवादी शरद पवार गटाने नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवारांकडून माढा, पंढरपूर आणि मोहोळमधील सस्पेन्सवर अखेर पडदा टाकला आहे. शरद पवारांनी माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे, अॅड. मिनल साठे हे इच्छुक होते. पण शरद पवारांनी अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधून अजित पवार गटाने ऐन वेळेस ठाकरे गटाकडून आयात केलेल्या उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांना उमेदवारी दिल्याने महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते नाराज झाले आहे. नाराज झालेल्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अर्ज भरण्यासाठी आले असताना अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेले शिवसेना शिंदे गटाचे कुलदीप कोंडे आणि महायुतीचे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं गोंधळ झाला. यावेळी कार्यकर्त्यांची एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.
वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार लखन मलिक उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शब्द आणि आदेश दिल्यानंतर आज कारंजा मतदारसंघातील उमेदवार सईताई डहाके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली
अमरावती : रवी राणा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एका रॅलीत जबरदस्त भाषण केले. माझ्या लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी 3000 हजार झाले पाहिजे. मी ज्या गरीबीतून या ठिकाणी पोहचलो ते मी विसरलो नाही..गरीबीची जाण मला आहे. श्रीमंती आली तर माजू नका गरिबी आली तर लाजू नका. मी सरकार मध्ये बसल्यावर १५०० चे तीन हजार करा, अशी मागणी करेन, असे रवी राणा यांनी म्हटले.
शरद पवारांची युगेंद्र पवारांसाठी बारामतीत सभा पार पडत आहे. यावेळी शरद पवारांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन कुणी केला? हा पक्ष मी काढला. मी उभारलेला पक्ष माझ्याकडून काढून घेतला. केंद्र सरकारमध्ये चक्र फिरली आणि आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. पक्ष चिन्ह दुसऱ्याला देऊन टाकलं. आयुष्यात कधीही मी कोर्टात गेलो नाही. काही लोकांनी आमच्यावर खटला दाखल केला. आमच्यावर केस केली”, अशा शब्दात त्यांनी घणाघात केला.
परभणी : शिवसेना नेते आदित्य ठाकरे परभणीत दाखल झाले आहेत. आमदार राहुल पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे परभणीत आले आहेत. यावेळी ते रॅलीत सहभागी होणार आहेत. शनिवार बाजार येथून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही रॅली काढली जाणार आहे.
“नवा उद्योग हा महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये सुरु करा, असं मोदींनी टाटांना सांगितलं. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नरेंद्र मोदींनी गुजरातला नेला. त्यांना आतापर्यंत जसं यश मिळालं, तसं आता मिळणार नाही. यंदाची निवडणूक वेगळी आहे,” असं शरद पवार म्हणाले.
काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला. नुकत्याच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्याने सुहास नाईक नाराज झाले आहेत. सुहास नाईक यांना तीन वाजेपर्यंत पक्षाच्या एबी फॉर्म मिळणार असल्याची अपेक्षा आहे. एबी फॉर्म न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. यामुळे काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांची डोकेदुखी वाढणार आहे.
जळगाव- जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गिरीश महाजन यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं. शिरसाळा हनुमान मंदिरात गिरीश महाजनांनी हनुमानाची पूजा केली. पुन्हा महायुतीचं सरकार येऊ दे असं साकडं गिरीश महाजन यांनी हनुमंताला घातलं.
“पवार साहेब नेहमी जनतेचा विचार करतात म्हणून बारामतीकर त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी शरद पवार यांनी केली. जगातला सर्वात निर्यातदार देश आपण झालो ही बाब फक्त शरद पवार यांच्यामुळे शक्य झालं. आताची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना लोकसभेत यश नाही मिळालं म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. दोन महिने ही योजना चालवली आणि आता बंद केली,” अशी टीका युगेंद्र पवार यांनी केली.
“बारामतीचं नाव हे शरद पवारांनी जगात मोठं केलं. मला जेव्हापासून समजतंय तेव्हापासून बारामती हे शरद पवार यांच्या नावाने ओळखतात. माझे आदर्श हे फक्त पवार साहेब आहेत. लहानपणापासून मला जे ओळखतात त्यांना माहीत आहे हा पठ्ठया कधी शरद पवार यांना सोडणार नाही,” असं युगेंद्र पवार म्हणाले.
बारामती- “पवार साहेब माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा होता. तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. मी सर्व बारामतीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लोकसभेला वाटत होतं घासून होईल परंतु तसं झालं नाही,” असं युगेंद्र पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक हे मानखुर्द-शिवाजीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत.
संगमनेर – बाळासाहेब थोरात आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आमदार सत्यजित तांबे देखील बाळासाहेब थोरात यांच्या सोबत उपस्थित आहेत.
सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून लढवली होती अपक्ष निवडणूक, काँग्रेस पासून ते बरेच दिवस लांब होते. मात्र आज ते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत उपस्थित आहेत.
लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडी टीकाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्या टीकेला भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीच्या पोटात किती गोळा उठलेला आहे आपल्याला माहिती आहे.
ही योजना बंद करा म्हणून काँग्रेसवाले कोर्टात गेले. ही योजना सरकारला बुडवणारी आहे, असं उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे बोलत आहेत. पण लाडक्या बहिणी योजनांमुळे या लाडक्या बहिणी निश्चितच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत , असं गिरीश महाजन म्हणाले.
भाजपची चौथी यादी जाहीर झाली आहे. मीरा भाईंदर याठिकाणी अपक्ष आमदार गीता जैन यांना संधी नाहीच. भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी घोषित झाली आहे. तर उमरेड मधून सुधीर पारवेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांचा राजीनामा… उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा राजीनामा… शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून उमेदवारी भरणार… शिवसेनेची पारंपारिक जागा यावेळी भाजपला सुटल्याने नाराज होते मनोज मोरे …
भाजपच्या राजापूर लांजा विधानसभा क्षेत्र प्रमुख उल्का विश्वासराव यांचा राजिनामा… पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला… आज सकाळी 11 वाजता उल्का विश्वासराव करणार उद्धव ठाकरे सेनेत… उल्का विश्वासराव भाजपमधून राजापूर विधानसभा मतदार संघातून इच्छुक… उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत राजापूरमध्ये प्रवेश होणार…
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांचा राजीनामा… उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा राजीनामा… शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून उमेदवारी करणार… शिवसेनेची पारंपारिक जागा यावेळी भाजपला सुटल्याने नाराज होते मनोज मोरे …
पोलीस यंत्रणा एका पक्षाच्या कामाला जुंपलीय… अव्दय हिरेंना ठार मारण्याचा प्रयत्न होता… पण ते काल सुदैवानं बचावले… शिंदे गटाकडून आमच्या उमेदवारांना धमक्या देखील येत आहेत… दादा भुसेंच्या गुंडांकडून अव्दय हिरेंवर हल्ला… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
मोठं शक्ती प्रदर्शन करत राजेंद्र गावित उमेदवारी अर्ज दाखल करणार… शहादा तळोदा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे… राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्येच खडा जंगी रंगली आहे…
बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. बारामतीतील कन्हेरीत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रचाराला नारळ फोडला जाणार आहे.
रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीला धक्का बसला आहे. भाजपच्या राजापूर लांजा विधानसभा क्षेत्र प्रमुख उल्का विश्वासराव यांनी राजीनामा दिला आहे. पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. आज सकाळी 11 वाजता उल्का विश्वासराव करणार शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उल्का विश्वासराव भाजपमधून राजापूर विधानसभा मतदार संघातून इच्छुक आहेत. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत राजापूरमध्ये प्रवेश होणार आहे.
रत्नागिरी- दापोली विधानसभा मतदारसंघात राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार संजय कदम यांना एबी फाॅर्म मिळालाच नाही. एबी फाॅर्म मिळाला नसल्याने इथला उमेदवार बदलला जाणार, असा आरोप शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी केला आहे. पण या आरोपाचं संजय कदम यांनी खंडन केलंय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्याकडे एबी फाॅर्म आहे. पराभवाच्या वैफल्यातून योगेश कदम यांच्याकडून वक्तव्य करण्यात येतंय. दुसऱ्या अर्जात मी एबी फाॅर्म जोडलाय, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
रिसोड विधानसभा मतदार संघासाठी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अमित झनक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाशिम विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्याम खोडे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कारंजा विधानसभा मतदार संघासाठी महायुती च्या उमेदवार सई डहाके आणि महाविकास आघाडी कडून ज्ञायक पाटणी हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी चे बंडखोर तसेच काही अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीत घसरण झाली आहे. सोन्याचे ४५० रुपये, तर चांदीचे दर १६०० रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर ७९ हजार १५० रुपयांवर आले तर चांदीचे दर ९६ हजार ७०० रुपयांपर्यंत आले. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीचा मुहूर्त साधणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळालाय.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपने आतापर्यंत 150 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार गटाने 51 जागांवर आणि शिंदे गटाने 80 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. 288 पैकी महायुतीने 281 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. सात जागांवर उमेदवारी जाहीर करणं अजून बाकी आहे.
मोहोळ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार बदलला. सिद्धी कदम यांच्या ऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर. माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना दोन दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र काल मोहोळ मधील इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली. त्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रदेखील दिले आहे
मुंबादेवी इथून शायना एनसीविरोधात भाजपचेच अतूल शाह यांची बंडखोरी. आज भरणार अपक्ष नामांकन अर्ज. बांद्रा पूर्व इथे शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर अपक्ष रिंगणात उतरणार. आज सकाळी 9.30 वाजता भरणार उमेदवारी अर्ज. जिशान सिद्दीकी समोर शिवसेनेचे कुणाल सरमळकर रिंगणात उतरणार. मातोश्रीच्या अंगणात तिरंगी लढत. मानखुर्द अणूशक्तीनगर इथे एनसीपीच्या सना मलिक विरोधात भाजपचे माजी नगरसेवक बबलू पांचाल यांची बंडखोरी. आज करणार शक्ती प्रदर्शन.